Lok Sabha Election 2024 – वंचितकडून तिकीट, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसाची पक्षातून हकालपट्टी

Lok Sabha Election 2024 – वंचितकडून तिकीट, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसाची पक्षातून हकालपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने रविवारी दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये रमेश बारसकर यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

वंचित बहुजन आघाडीने रविवारी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून माढ्यातून रमेश बारसकर यांना उमेदवारी दिली आहे. रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रदेश सरचिटणीसपदी कार्यरत होते. मात्र वंचितकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

हे वाचा – महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत, सुटकेविरोधातील याचिकांवर हायकोर्टात आज सुनावणी

दरम्यान, अजित पवार गटातील नेते, मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क अलिकडच्या काळात वाढला होता. ही बाब लक्षात घेता, त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;