रक्षा खडसेंचे तिकीट ऐनवेळी बदलणार, अजित पवार गटाच्या नेत्याच्या विधानाने खळबळ
रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांचे तिकीट ऐनवेळी बदलले जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिले आहेत. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी मत व्यक्त केले आहे. भाजप पदाधिकाऱयांच्या नाराजी मुळे रावेर मतदार संघात बरीचशी कुजबूज चालू आहे. बऱयाचश्या हालचाली सुरू असल्याचंही संजय पवार यांनी सांगितले.
रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांचं तिकीट ऐनवेळी रद्द होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सूचक संकेत दिले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱयांमध्ये बरीचशी नाराजी आणि कुजबूज यामुळे हालचाली सुरू आहे. त्यामुळे काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही हे सांगता येणार नाही. रावेरमध्ये उमेदवार बदलणार असल्याच्या प्रश्नावर संजय पवार म्हणाले, काय होईल ते काहीच सांगता येत नाही. गेल्यावेळी प्रचार करत असताना स्मिता वाघ यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र, यंदा त्यांचे तिकीट कापले जाणार नाही. त्या उमेदवार म्हणून कायम राहतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List