शिर्डी बस लूट प्रकरणातील आरोपी नऊ वर्षांनंतर पोलिसांच्या जाळय़ात

शिर्डी बस लूट प्रकरणातील आरोपी नऊ वर्षांनंतर पोलिसांच्या जाळय़ात

गुजरातकडे जाणाऱया लक्झरी बसमधील प्रवाशाला 2015 मध्ये शिर्डीमध्ये लुटण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. केडगाव) हा नऊ वर्षांपासून फरार होता. त्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

दि. 28 एप्रिल 2015 रोजी घटनेतील फिर्यादी रमेशभाई भाईचंद पटेल ( हल्ली रा. सावंत चेंबर्स, ख्रिस्तगल्ली) हे नगरहून लक्झरी बसने सुरत, गुजरात येथे निघाले होते. जाताना शिर्डी येथील खंडोबा मंदिरासमोर दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी केली. ‘तुम्ही चोरी करून आले असून, पोलीस स्टेशनला चला’, असे सांगत लक्झरी बसमधून खाली उतरून तवेरा गाडीत बसवले व त्यांच्या जवळील पाच लाख रुपयांची रोकड काढून घेतली होती. त्यानंतर फिर्यादीस कोपरगाव येथे सोडून देत त्यांनी पळ काढला होता.

तत्कालीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुह्याचा तपास करून राजेंद्र मोहन फडतरे, विकास पोपट झरेकर, मनोज दत्तात्रय शिंदे, सचिन प्रकाश राजगुरू (सर्व रा. केडगाव), पंकज तान्हाजी गडाख (रा. टाकळी काझी, ता. नगर), नितीन पटेल यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला होता. यातील मच्छिंद्र पोपट कांडेकर हा अद्यापपर्यंत फरार होता.

दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आहेर यांनी पथकातील राजेंद्र वाघ, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, देवेंद्र शेलार, मयूर गायकवाड व उमाकांत गावडे आदींचे पथक नेमून कारवाई सुरू केली.

मच्छिंद्र पोपट कांडेकर या आरोपीचा शोध घेत असताना तो हा आरोपी 28 मार्च रोजी कात्रड, वांबोरी (ता. राहुरी) येथे नातेवाईकांकडे येणार आहे, अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. पोलीस पथकाने लागलीच तेथे छापा टाकत मच्छिंद्र पोपट कांडेकर यास ताब्यात घेऊन अटक केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;