उत्तम आरोग्यासाठी नाश्ता करण्याचे फायदे, वाचा

उत्तम आरोग्यासाठी नाश्ता करण्याचे फायदे, वाचा

सकाळी लवकर घरातून बाहेर पडताना काहीतरी खाणे हे खूप गरजेचे आहे. नाश्ता करुन बाहेर पडायलाच हवे हे आपल्याला जुनी जाणती माणसं कायम सांगत आलेली आहेत. अनेकदा काही लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता वगळतात. परंतु असे केल्याने शरीरातील चयापचय मंदावते आणि ऊर्जा कमी होते, त्यामुळे दिवसभर एनर्जी वाटत नाही. रात्रीच्या जेवणानंतर, आपल्या शरीराला सकाळी काम करण्यासाठी भरपूर ऊर्जेची आवश्यकता असते, म्हणून सकाळी ओट्स, कॉर्नफ्लेक्स, दलिया, इडली सांबार असे हलका ब्रेकफास्ट करणे गरजेचे आहे.

प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ मुलांसाठी किती घातक? लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर

नाश्त्यामुळे आपल्यामध्ये उर्जेचा स्त्रोत कार्यरत होतो. त्यामुळे अंडी किंवा अंकुरलेली कडधान्य खाणे हे फार गरजेचे आहे. यामुळे आपल्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होण्यास मदत होते.

सकाळी उठून ब्रेकफास्ट करणे हे खूप गरजेचे आहे. कारण आपण रात्रीच्या जेवणाच्या दीर्घ अंतरानंतर, पहिल्यांदा काहीतरी खात असतो. त्यामुळे दिवसभर किमान ऊर्जा प्रदान करण्यासाठी पुरेसा पौष्टिक ब्रेकफास्ट करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी ब्रेकफास्ट करणे हे खूप गरजेचे आहे.

ढाबा स्टाईल मक्याची रोटी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, वाचा

काही लोकांना दररोज ब्रेड ऑम्लेट, पराठा, ब्रेड बटर किंवा मिल्क कॉर्नफ्लेक्स असे नाश्ता करण्याची सवय असते. त्याऐवजी, दररोज वेगवेगळे नाश्ता करण्याची सवय लावा. अशा प्रकारे तुम्हाला तेच तेच अन्न खाण्याचा कंटाळा येणार नाही आणि दुसरे म्हणजे तुम्हाला प्रत्येक अन्नपदार्थातून पोषक तत्वे मिळू शकतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

त्वचेला नवा तजेला देण्यासाठी काॅफीचा कसा वापर कराल, जाणून घ्या त्वचेला नवा तजेला देण्यासाठी काॅफीचा कसा वापर कराल, जाणून घ्या
हिवाळ्यात अनेकांना कॉफी प्यायला खूप आवडते. परंतु काॅफी केवळ आपला थकवा घालवणारी नाही तर, काॅफीमुळे आपल्याला सुंदरही दिसता येते. कॉफीचा...
सुंदर दिसण्याकरता लिंबाचा वापर कसा करावा, वाचा
DPBI चे अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त व्यक्तीची 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक, देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mumbai News – चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या, आरोपी पतीला पोलिसांकडून अटक
शेती सोडून मुंबई-पुण्याच्या मागे धावू नका, हिंमत हरलेला योद्धा युद्ध जिंकत नाही; कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचा कानमंत्र
Delhi Blast Update – दहशतवादी भाषणे आणि बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग! डॉ. मुजम्मिलच्या मोबाईलमध्ये सापडले शेकडो पुरावे
IND vs SA – शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; उपचारांसाठी मुंबई गाठणार, गुवाहाटीत पंतच्या हाती टीम इंडियाची कमान