DPBI चे अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त व्यक्तीची 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक, देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

DPBI चे अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त व्यक्तीची 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक, देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अज्ञात सायबर भामट्यांनी ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’चे अधिकारी असल्याचे भासवून एका ७१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची २२ लाख २० हजार रुपयांची आँनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात सायबर गुन्हेगारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, जनार्दन काशीनाथ अणेराव (वय – ७१, रा. ठाणे, मूळ रा. आंगवली, ता. संगमेश्वर) यांना १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १०.०० वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून (मो.नं. ७२३१९०५९५५) फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव आर. के. चौधरी सांगितले आणि आपण ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया, मुंबई’ येथून बोलत असल्याचे भासवले. चौधरी याने अणेराव यांना सांगितले की, त्यांच्या सिमकार्ड क्रमांकावरून लोकांना त्रास दिला जात आहे व पैशांची मागणी केली जात आहे. या संदर्भात त्यांच्याकडे एमएच ८०७४/२०२५ या क्रमांकाची तक्रार दाखल आहे, असे सांगून त्यांना तात्काळ अटक करण्याची धमकी देण्यात आली.

या धमकीमुळे घाबरलेल्या फिर्यादींना नंतर जॉर्ज मॅथ्यू नावाच्या व्यक्तीने (मो.नं. ८४३२३९७५७९) संपर्क साधला आणि त्यांचे सर्व तपशील घेतले. बनावट अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या या सायबर गुन्हेगारांनी अणेराव यांना कायदेशीर कारवाईची भीती दाखवून वेगवेगळ्या टप्प्यांत त्यांच्याकडून तब्बल २२ लाख २० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकारानंतर अणेराव यांनी देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) आणि व्ही. एम. एस. २०२३ चे कलम ३१८ (४), (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे करत आहेत. पोलीस सध्या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयातून किंवा बोर्डाकडून फोन आल्यास नागरिकांनी तात्काळ त्या माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

त्वचेला नवा तजेला देण्यासाठी काॅफीचा कसा वापर कराल, जाणून घ्या त्वचेला नवा तजेला देण्यासाठी काॅफीचा कसा वापर कराल, जाणून घ्या
हिवाळ्यात अनेकांना कॉफी प्यायला खूप आवडते. परंतु काॅफी केवळ आपला थकवा घालवणारी नाही तर, काॅफीमुळे आपल्याला सुंदरही दिसता येते. कॉफीचा...
सुंदर दिसण्याकरता लिंबाचा वापर कसा करावा, वाचा
DPBI चे अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त व्यक्तीची 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक, देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mumbai News – चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या, आरोपी पतीला पोलिसांकडून अटक
शेती सोडून मुंबई-पुण्याच्या मागे धावू नका, हिंमत हरलेला योद्धा युद्ध जिंकत नाही; कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचा कानमंत्र
Delhi Blast Update – दहशतवादी भाषणे आणि बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग! डॉ. मुजम्मिलच्या मोबाईलमध्ये सापडले शेकडो पुरावे
IND vs SA – शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; उपचारांसाठी मुंबई गाठणार, गुवाहाटीत पंतच्या हाती टीम इंडियाची कमान