थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळसा जाळला, चार कामगारांचा गुदमरून मृत्यू

थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळसा जाळला, चार कामगारांचा गुदमरून मृत्यू

थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री रुममध्ये कोळसा जाळणे चार तरुणांच्या जीवावर बेतले आहे. कोळसा जाळल्याने कार्बनडाय ऑक्साईडमुळे गुदमरून चौघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पंकी पोलीस स्टेशन परिसरातील तेलबिया कंपनीच्या खोलीत चार कामगारांचा मृत्यू झाला. घटनास्थळी एका भांड्यात जळणारा कोळसा सापडला. यावरून कोळशातून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइडमुळे गुदमरून कामगारांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. अमित वर्मा (32), संजू सिंग (22), राहुल सिंग (23) आणि दाऊद अन्सारी (28) अशी मृतांची नावे आहेत. मयत चौघेही देवरिया जिल्ह्यातील रहिवासी होते. चौघेही एकाच कंपनीत काम करत होते.

चौघेही कंपनीच्या आवारातील एका लहान खोलीत झोपले होते. सकाळी सहकाऱ्यांनी दार उघडले तेव्हा चौघेही बेशुद्धावस्थेत आढळले. चौघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावरून एका लोखंडी भांड्यात जळणारा कोळसा आढळला. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे विषारी वायू तयार झाला आणि यामुळे चौघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला
शिंदेनी स्वत: फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. अख्ख्या जगाला ते माहित आहे. त्यावरच मिंधे गट अवलंबून आहे. आता त्यांना सुरत, गुवाहटी...
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला हवे?
थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळसा जाळला, चार कामगारांचा गुदमरून मृत्यू
देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख
ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका, 1,400 कोटींची मालमत्ता जप्त