देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख

देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख

संगमेश्वर तालुक्यातील सुपीक दरी, सप्तलिंगी नदीचे पवित्र जल आणि स्थानिक शेतकऱ्यांची परंपरागत शेतीकला यांच्या मिलाफातून निर्माण झालेला लाल भात आता एका नव्या ओळखीसह समोर येत आहे. ‘सप्तलिंगी लाल भात’ या नावाने हा औषधी, चविष्ठ आणि पौष्टिक भात अधिकृतपणे ब्रँड केला जाणार असून, त्याला राष्ट्रीय स्तरावर नेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे तालुक्याच्या कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी संकल्प प्राईड शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सक्रीय सहकार्यातून हा प्रकल्प साकारला जात आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि योग्य हवामानामुळे या भागातील लाल तांदळाला एक विशिष्ट नैसर्गिक सुगंध, चव आणि औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत. याच भौगोलिक वेगळेपणाचा उपयोग करून देवरूखची ही ओळख आता जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सप्तलिंगी लाल भात हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानला जातो. यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असल्याने तो रक्तवर्धक असून शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतो. यातील उच्च फायबरमुळे पचनाच्या तक्रारी कमी होतात आणि पोट हलके राहते. तसेच नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियममुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. विशेष म्हणजे, याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर वाढण्याचे प्रमाण मंदावते, ज्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी हा भात लाभदायी ठरतो. याशिवाय झिंक, बी-विटामिन्स आणि खनिजे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही हा भात उपयुक्त ठरतो.

उत्पादन, गुणवत्ता आणि मार्केटिंग या तिन्हींची सांगड घालत संगमेश्वर तालुक्यातून एक मजबूत ग्रामीण औद्योगिक ब्रँड उभा राहत आहे. ‘सप्तलिंगी लाल भात’ हा उपक्रम केवळ तंदुरुस्तीपुरता मर्यादित नसून तो स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय ठरणार आहे. देवनगरी देवरुखची ही अनोखी नैसर्गिक देणगी आता आरोग्यासह अर्थव्यवस्थेचाही कणा बनणार असल्याचे दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला
शिंदेनी स्वत: फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. अख्ख्या जगाला ते माहित आहे. त्यावरच मिंधे गट अवलंबून आहे. आता त्यांना सुरत, गुवाहटी...
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला हवे?
थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळसा जाळला, चार कामगारांचा गुदमरून मृत्यू
देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख
ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका, 1,400 कोटींची मालमत्ता जप्त