Beed News – पहाटेच्या थंडीत व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका, माजलगावमध्ये डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Beed News – पहाटेच्या थंडीत व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका, माजलगावमध्ये डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

पहाटेच्या थंडीत मॉर्निंग वॉकनंतर व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना माजलगावमध्ये घडली. डॉ. चंद्रशेखर उजगरे (54) असे मयत डॉक्टरचे नाव आहे. डॉ.चंद्रशेखर उजगरे हे पशुवैद्यकीय अधिकारी असून सध्या जिल्ह्यातील वडवणी येथे शासकीय पशुवैद्य दवाखान्यात ते कार्यरत होते.

शालेय जीवनात फुटबॉल खेळाडू असलेले डॉ. चंद्रशेखर हे नियमित मॉर्निंग वॉकला जात असत. जवळपास तासभर वॉक केल्यानंतर ते व्यायाम करत असत हा त्यांचा नित्यनेम होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डॉ. चंद्रशेखर हे येथील सोळंके महाविद्यालयातील ट्रॅकवर वॉकिंग केल्यानंतर व्यायाम करत होते. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते कोसळले. वॉकसाठी आलेले अन्य शिक्षक धारक आणि इतरांनी तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला आता मिंध्यांना सुरत, गुवाहटी आठवत असेल, अंबादास दानवे यांचा टोला
शिंदेनी स्वत: फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. अख्ख्या जगाला ते माहित आहे. त्यावरच मिंधे गट अवलंबून आहे. आता त्यांना सुरत, गुवाहटी...
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला हवे?
थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळसा जाळला, चार कामगारांचा गुदमरून मृत्यू
देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख
ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका, 1,400 कोटींची मालमत्ता जप्त