मुंब्रा अपघाताच्या चौकशीत गोलमाल रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका, रेल कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा

मुंब्रा अपघाताच्या चौकशीत गोलमाल  रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका, रेल कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱयांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याच्या मुद्द्यांवर रेल कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका, कर्मचाऱ्यांवरील अन्यायकारक कारवाई खपवून घेणार नाही. कर्मचाऱ्यांविरोधातील संबंधित गुन्हे तातडीने मागे घ्या, अन्यथा शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रेल कामगार सेनेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 9 जून रोजी लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातप्रकरणी रेल्वेच्या दोघा अभियंत्यांसह इतर कर्मचारी-अधिकाऱ्यांविरुद्ध ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर तीव्र पडसाद उमटले असून रेल्वे कर्मचाऱयांना नाहक गुह्यात गोवण्याच्या षड्यंत्राचा रेल कामगार सेनेने निषेध केला. शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या आदेशावरून कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव (बाबी) यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यालाच अनुसरून मुंब्रा अपघाताच्या चौकशीतील गोलमाल आणि नियोजित कारवाईचा रेल कामगार सेनेने तीव्र शब्दांत जाहीर निषेध नोंदवला. रेल्वे अपघात बहुआयामी व तांत्रिक बाबींचा परिणाम असतात. त्यासाठी केवळ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविणे चुकीचे आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांवरील कारवाई तत्काळ थांबवावी, अन्यथा संघटना शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करेल आणि त्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची असेल, असा इशारा रेल कामगार सेनेने दिला आहे.

काहींना वाचवण्यासाठी तपास दुसऱ्या यंत्रणेकडे!  

मुंब्रा अपघाताचा तपास व्हीजेटीआयकडे सोपवणे, त्या संस्थेच्या चौकशी अहवालात रेल्वे कर्मचारीअधिकाऱ्यांना थेट दोषी ठरविणे, त्याआधारे जीआरपीमार्फत एफआयआर दाखल करून अटक वॉरंट जारी करणे या सर्व बाबी अत्यंत चुकीच्या आणि अन्यायकारक आहेत. ही प्रक्रिया न्यायाच्या मूलभूत तत्त्वांना धरून नाही. कोणत्याही तांत्रिक तपासणी अहवालाच्या आधारे रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे पूर्णपणे चुकीचे आहे. रेल्वेकडे सक्षम तपास यंत्रणा असताना कोणाला तरी वाचविण्यासाठी तपास दुसऱ्या यंत्रणेकडे दिला, असा दावा रेल कामगार सेनेने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता रस्ता चुकणार नाही, योग्य नेव्हिगेशन दाखवणार; Google Maps ने लॉन्च केले नवे फिचर आता रस्ता चुकणार नाही, योग्य नेव्हिगेशन दाखवणार; Google Maps ने लॉन्च केले नवे फिचर
नेव्हिगेशनसाठी गूगल मॅप्स अत्यंत विश्वासार्ह मानले जाते. आता या गुगल मॅप्समध्ये एक नवीन फीचर लॉन्च करण्यात आले आहे. याच्या मदतीने...
आरसीबीच्या चाहत्यांना ‘विराट’ धक्का; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विक्रीला, आगामी हंगामापूर्वी पूर्ण होणार व्यवहार
रजोनिवृत्तीनंतर वजन वेगाने वाढत असेल तर हा कर्करोग होऊ शकतो, वाचा
AI मुळेच नापास झाली, Chat gtp ने दिली चुकीची उत्तरे; प्रसिद्ध सेलिब्रिटीचा रंजक किस्सा
अमेरिकेशी व्यापार करार करत चीनची मोठी खेळी; डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव फसला
हिवाळ्यात सकाळी जाॅगिंगला किंवा वाॅकिंगला जाण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा
हे खूप भयानक आहे! राहुल गांधी यांच्या गौप्यस्फोटानंतर ब्राझिलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, फोटोबाबतही केला खुलासा