भारतीय वंशाचे ममदानी न्यूयॉर्कचे मेयर

भारतीय वंशाचे ममदानी न्यूयॉर्कचे मेयर

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे नवे महापौर झाले आहेत. ममदानी यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा आणि अपक्ष उमेदवार अॅण्ड्रय़ूज कुओमो या दिग्गजांचा पराभव करत इतिहास रचला. अमेरिकेच्या सर्वात मोठय़ा शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवणारे ममदानी हे
पहिले दक्षिण आशियाई आणि पहिले मुस्लिम ठरले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे ही निवडणूक जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच ममदानी यांना तीव्र विरोध केला होता. ममदानी महापौर झाल्यास न्यूयॉर्कचा निधी थांबवण्याची धमकीही त्यांनी दिली होती. ममदानी यांनी मात्र सकारात्मक प्रचार करत मतदारांची मने जिंकली.

‘धूम मचा ले धूम…’

बॉलीवूडमधील गाण्यांचा आधार घेऊन निवडणुकीचा प्रचार करणाऱया ममदानी यांनी विजयाचे सेलिब्रेशनही त्याच स्टाईलमध्ये केले. सेलिब्रेशनसाठी सहकुटुंब स्टेजवर असताना ‘धूम मचा ले धूम…’ हे गाणे वाजत होते.

ट्रम्प यांचा शेवटपर्यंत आटापिटा

ममदानी यांना पराभूत करण्यासाठी ट्रम्प अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला, मात्र ममदानी यांच्या लोकप्रियतेपुढे ही रणनीती अपयशी ठरली.

गजाला हाशमी वर्जिनियाच्या उपमहापौरपदी

ममदानी यांच्याबरोबरच हिंदुस्थानी वंशाच्या गजाला हाशमी यांनी वर्जिनिया शहराच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. हाशमी यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला होता. वयाच्या पाचव्या वर्षी कुटुंबीयांसह त्या अमेरिकेत गेल्या आणि तिथेच स्थायिक झाल्या.

विजयी भाषणात नेहरूंचा उल्लेख

विजयानंतर केलेल्या भाषणात ममदानी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ऐतिहासिक वाक्यांचा उल्लेख केला. ‘जुने सोडून नव्याकडे जाण्याचा असा क्षण इतिहासात क्वचितच येतो. हा तो क्षण असतो जेव्हा एका युगाचा अंत होतो, जेव्हा अनेक वर्षे दबल्या गेलेल्या ‘आतल्या आवाजाला’ अभिव्यक्त होण्याची संधी मिळते,’ असे ममदानी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ सोप्या उपायांचा अवलंब केल्यास मुलांच्या जवळही फिरकणार नाही डास ‘या’ सोप्या उपायांचा अवलंब केल्यास मुलांच्या जवळही फिरकणार नाही डास
संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू होतो. त्याच बरोबर आता दिवसाही डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण डास हे घराच्या...
पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने बडतर्फ, महिला डॉक्टर आत्महत्या
वेळापुरात सापडले छत्रपती शाहू महाराजांचे शिल्प
महाराष्ट्रात दगाबाज सरकार, गावागावात फलक लावा… जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मत नाही! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
ब्राझिलच्या मॉडेलने केले 22 वेळा मतदान! हरयाणात 25 लाख मतांची चोरी; B ब्राझिलियन, J जनता, P पार्टी
राहुल गांधी यांचे सादरीकरण प्रत्येक हिंदुस्थानीने पाहण्यासारखे, आदित्य ठाकरे यांनी केले कौतुक
उद्धव ठाकरेंमुळे माझी एक एकर जमीन वाचली, ते बोलावतील तिथे ट्रक्टर घेऊन जाईन; आता एकच लक्ष्य शिवसेनेची मशाल