बेकायदा उपसा केलेली रेती कांदळवनाच्या जागेत लपवली, महसूल विभागाने साठा पुन्हा खाडीत लोटला
भिवंडी तालुक्यातील केवणी गावात गेल्या काही महिन्यांपासून माफिया बेकायदेशीरपणे खाडीतून रेतीचा उपसा करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. वनखात्याच्या कांदळवन जागेत ही रेती लपवण्यात आली होती. महसूल विभागाला याची माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने छापा टाकून दोन मोठ्या कुंड्यांमध्ये रेती लपवल्याचे आढळून आले. पोलीस बंदोबस्तात कारवाई करत ही रेती पुन्हा खाडीमध्ये लोटण्यात आली. या कारवाईमुळे भिवंडीतील रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
केवणी गावाच्या हद्दीतील खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. तहसीलदार अभिजित खोले यांनी त्याची गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. कोपर केवणी येथील ग्राम महसूल अधिकारी, काल्हेरचे अधिकारी मुजीब शेख, वनरक्षक प्रशांत वायाळ यांच्या पथकाने धाव घेऊन रेतीमाफियांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला. खाडीकिनारा व वनविभागाच्या संरक्षक भिंतीदरम्यान रेतीचा साठा लपवून ठेवण्यासाठी माफियांनी 15 कुंड्या तयार ठेवल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्ष दोन कुंड्यांमध्ये रेती होती. महसूलच्या पथकाने शोध घेऊन रेती पकडली आणि ती जवळच्या खाडीमध्ये पुन्हा लोटून दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List