महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या कामगारांना पगारवाढ
कांदिवली येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्रामधील कामगारांना 17 हजार 900 इतकी भरघोस पगारवाढ मिळाली आहे. सरचिटणीस आमदार सचिन अहीर यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा अॅण्ड महिंद्रा वर्कर्स युनियनने यासाठी पाठपुरावा केला. कंपनीतील 1300 कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
पगारवाढीच्या करारावर वर्कर्स युनियनचे सरचिटणीस सचिन अहिर, अध्यक्ष रमेश ओटाली आदींनी, तर कंपनी मॅनेजमेंटकडून चीफ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन विनय खानोलकर, व्हाईस प्रेसिडेंट ई. आर. संग्रामसिंग देशमुख व प्लांट हेड टॉम थॉमस आदींना सह्या केल्या. या कराराप्रमाणे पगारवाढीचा पहिला टप्पा 94 टक्के, दुसरा टप्पा 97 टक्के आणि अंतिम तिसरा टप्पा 100 टक्के असणार आहे. कराराची मुदत साडेतीन वर्षे आहे. यावेळी पगारवाढीचे वैशिष्ट्य सांगताना सचिन अहिर म्हणाले की, करार करताना आरोग्य सेवेसह इतर कोणत्याही सेवा बंद केल्या जाणार नाहीत. सर्वच विभागांतील कामगारांना समान न्याय मिळेल याची युनियनने काळजी घेतली आहे. यावेळी सेक्रेटरी कृष्णकांत कोकाटे उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List