नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 25 किलो अमली पदार्थ केले नष्ट
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई युनिटने नवी मुंबईतील ड्रग प्रकरणी जप्त केलेले अमली पदार्थ आज नष्ट केले. नष्ट केलेल्या ड्रगमध्ये हायड्रो गांजा, गांजाचा समावेश आहे. एनसीबी मुंबई झोनल युनिटने नवी मुंबईतून ड्रग सिंडिकेटच्या मुसक्या आवळल्या. एनसीबीने कारवाई करून 25 किलो कोकेन, गांजा, जप्त केला होता. या प्रकरणी एनसीबीने काही तस्करांना अटक केली होती. त्याच्या चौकशीत काही परदेशातील ड्रग तस्कराची माहिती एनसीबीच्या हाती लागली होती. हिंदुस्थानात अवैधपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तस्करांना अटक केली होती. त्याच्या अटकेने मुख्य सूत्रधारापर्यंत एनसीबी पोहचली. मुख्य सूत्रधाराला मलेशिया येथून हिंदुस्थानात आणून अटक केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List