आता रस्ता चुकणार नाही, योग्य नेव्हिगेशन दाखवणार; Google Maps ने लॉन्च केले नवे फिचर

आता रस्ता चुकणार नाही, योग्य नेव्हिगेशन दाखवणार; Google Maps ने लॉन्च केले नवे फिचर

नेव्हिगेशनसाठी गूगल मॅप्स अत्यंत विश्वासार्ह मानले जाते. आता या गुगल मॅप्समध्ये एक नवीन फीचर लॉन्च करण्यात आले आहे. याच्या मदतीने आता वाहनचालकांना लेन नेव्हिगेशन सुविधा मिळणार आहे. त्यामुळे प्रवास सोपा होणार असून प्रवासात योग्य मार्ग निवडण्यासाठी मदत होईल. गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये या फीचरची सविस्तर माहिती दिली आहे. हे फिचर अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सारखेच आहे.

गुगलच्या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगल मॅप्सने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वर चालणारे लाईव्ह लेन गाईडन्स फीचर लॉन्च केले आहे. कंपनीने या फीचरला अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी एक छोटा व्हिडिओ देखील एम्बेड केला आहे. व्हिडिओमध्ये लाईव्ह लेन फीचर कसे काम करते हे स्पष्ट केले आहे.जेव्हा कार तिच्या निवडलेल्या लेनपासून भटकटते तेव्हा ड्रायव्हरला डावीकडे किंवा उजवीकडे वळण्यास सांगितले जाईल. कधीकधी, वळण घेण्यापूर्वी किंवा उड्डाणपुलापूर्वी लेन बदलणे आवश्यक असते, तेव्हा देखील संकेत दिले जातील.

गुगल मॅप्सच्या नवीन वैशिष्ट्याचे फायदे

वळण किंवा उड्डाणपुलाजवळून प्रवास करताना, नवीन ठिकाणी कोणती लेन घ्यावी हे ठरवण्यासाठी चालकांना अनेकदा अडचण येते. त्यामुळे अनेकदा ते चुकीचा रस्ता निवडतात किंवा चुकून उड्डाणपुलात प्रवेश करतात. नवीन फीचर लाइव्ह लेनच्या सहाय्याने या चूका टाळता येणार आहे.

आफ्टरमार्केट डॅशकॅमची ADAS सारखी वैशिष्ट्ये

गुगल मॅप्समधील हे नवीन फीचर आफ्टरमार्केट डॅश कॅममध्ये आढळणाऱ्या ADAS फीचरसारखेच वाटू शकते. ADAS च्या नावाने ते डॅश कॅम लेन बदलल्याचे आढळल्यास अलर्ट देतात आणि ड्रायव्हरला योग्य लेनमध्ये राहण्याचा सल्ला देतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हात लिहिता राहिला पाहिजे… रुग्णालयातून संजय राऊत यांची पोस्ट, फोटो व्हायरल हात लिहिता राहिला पाहिजे… रुग्णालयातून संजय राऊत यांची पोस्ट, फोटो व्हायरल
दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे तूर्त काही दिवस विश्रांती घेण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून...
निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा, अरे आता कुठे पळाला मत चोरा? उद्धव ठाकरेंचा घणाघात, फडणवीस-अजितदादांचा ऑडियो ऐकवला
जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण, आसामच्या माजी डीजीपीच्या भावावर आरोप
स्वयंपाकघरात सापडला सांगाडा; एक वर्षानंतर पोलिसांनी केला हत्येचा उलगडा
तुम्हीसुद्धा आहारामध्ये हे पदार्थ खात असाल तर आजच बंद करा, जाणून घ्या
आमच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण कराल तर…; पोलंडची रशियाला धमकी
आश्चर्यकारक! अचानक घरी परतला अंत्यसंस्कार झालेला युवक…वाचा सविस्तर…