Photo – मराठवाड्यात उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बळीराजाने मांडल्या व्यथा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी आज बीड जिल्ह्यातील पाली येथे, धाराशिवमधील भूम तालुक्यातील उळूप गावात, भूम तालुक्यातील पाथरुड गावात आणि परांडा तालुक्यातील शिरसाव येथील शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना आमदार कैलास पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.





About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List