Ashes Series 2025 – ऑस्ट्रेलियाने विस्फोटक फलंदाजाला पहिल्या सामन्यातून दाखवला बाहेरचा रस्ता

Ashes Series 2025 – ऑस्ट्रेलियाने विस्फोटक फलंदाजाला पहिल्या सामन्यातून दाखवला बाहेरचा रस्ता

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये बहुप्रतीक्षित Ashes Series ला 21 नोव्हेंबर पासून सुरूवात होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने तरुण विस्फोटक फलंदाज सॅम कॉन्स्टसला मालिकेच्या पहिल्या सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हा तोच सॅम कॉन्स्टस आहे ज्याच्यासोबत विराट आणि जसप्रीत बुमराहच बॉर्डर गावस्कर करंडकात वाजलं होतं. मात्र, त्याला आता अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या सामन्यातून वगळल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अॅशेस मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार असून पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 15 सदस्यीस संघाची घोषणा केली आहे. मात्र, या संघातून सॅम कॉन्स्टसला वगळण्यात आले आहे. सॅम कॉन्सटन्सने बॉर्डर गावस्कर करंडकात मेलबर्न कसोटीमध्ये दमदार फलंदाजी केली होती. तसेच सिडनी कसोटी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसोबत त्याची मैदानावरच बाचाबाच झाली होती. त्यामुळे काही काळासाठी मैदानावरचं वातावरण गरम झालं होतं. मात्र, त्याला आता इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, ब्रेंडन डॉगेट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मिशेल स्टार्क, जेक वेदरल्ड, ब्यू वेबस्टर

पहिल्या कसोटा सामन्यासाठी इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक्स, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जोश टंग, मार्क वूड.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या ठेकेदारांना सूचना मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या ठेकेदारांना सूचना
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाची पाहणी केली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना देतानाच त्यांनी...
US Minuteman III Test – अमेरिकेने केली अणु क्षेपणास्त्राची चाचणी, १४ हजार किमीची आहे मारक क्षमता
Ratnagiri News – हुल्लडबाजी आली अंगलट; आंजर्ले येथील समुद्राच्या पाण्यात कार बुडाली
जर एकही वैध मतदार हटवला तर मी मोदी सरकार पाडून टाकीन, ममता बॅनर्जी यांचा इशारा
Photo – मराठवाड्यात उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बळीराजाने मांडल्या व्यथा
Ashes Series 2025 – ऑस्ट्रेलियाने विस्फोटक फलंदाजाला पहिल्या सामन्यातून दाखवला बाहेरचा रस्ता
दारू प्यायल्याने खरंच थंडी वाजत नाही? नेमकं सत्य काय? वाचा…