वेगवान वाहनांना आता बसणार चाप, सातारा परिवहनकडे 4 स्पीडगन इंटरसेप्टर वाहने दाखल

वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने सातारा जिह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात 4 स्पीडगन इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. ही वाहने महामार्ग, राज्यमार्ग व अन्य ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.

राज्याच्या परिवहन विभागाकडून सातारा जिह्याला 4 नवीन स्पीडगन इंटरसेप्टर वाहने मिळाली असून, या वाहनांत अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. वेगमर्यादा निश्चित करून देण्यात आलेल्या रस्त्यावर वेगमर्यादा ओलांडून जाणारे वाहन सहजपणे टिपता येणार आहे.

गाडीच्या काचांना बसवण्यात आलेली काळ्या रंगाची फिल्म किती जाडीची आहे, याचीही तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर चालक मद्यपान करून तर वाहन चालवत नाही ना, याची तपासणी करण्यासाठी ब्रेथ अनालायझर मशीन याच वाहनात बसवण्यात आली आहे. त्यामुळे वायुवेग पथकासह भरारी पथकांना तपासणी करण्यास येणारी अडचण दूर होणार आहे. महामार्गासह राज्यमार्ग व जिल्हामार्गावरील वेगवान वाहनांना रोखण्यासाठी आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी इंटरसेप्टर वाहने तैनात करण्यात येणार आहेत. एकाचवेळी अनेक वाहनांच्या नोंदी होणार आहेत. हायटेक स्पीड गनचा वापर करून जास्तीत जास्त वाहने एकाच कॅमेऱयात टिपून त्यांच्या वेगाच्या नोंदी ठेवतील. निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवणाऱयांना ई-चलन जारी केले जाईल आणि दंड ऑनलाइन भरण्यासाठी मोबाईल फोनवर संदेश मिळणार आहेत.

वाहनांच्या वाढत्या वेगामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती होण्यासाठी परिवहन विभागाची अंमलबजावणी यंत्रणा अधिक परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून बदल होत चालला आहे. इंटरसेप्टर वाहनामुळे मोटार वाहन कायद्याची व नियमांची तसेच रस्ता सुरक्षाविषयक बाबींची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;