जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम
जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे 1 लाख 20 हजार नागरिकांना सेवा देणारे राज्यातील एकमेव आरोग्य केंद्र आहे. शासनाच्या विविध योजना व रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देत असलेले जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने ‘स्वच्छ, सर्वांग सुंदर दवाखाना’ उपक्रमात सलग तिस ऱ्या वर्षी जिह्यात प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे. आरोग्य केंद्राला 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
जयसिंगपूर येथील आरोग्य केंद्रातून जयसिंगपूर 60 हजार, उदगाव 22 हजार, चिंचवाड 6 हजार, चिपरी 15 हजार, कोंडीग्रे 5 हजार, संभाजीपूर 6 हजार अशा सुमारे 1 लाख 20 हजार लोकसंख्येला सेवा देणारे राज्यातील एकमेव आरोग्य केंद्र आहे. इतर प्राथमिक आरोग्य केंद्रावर फक्त 30 ते 35 हजार लोकसंख्येसाठी आरोग्य केंद्र असते.
गेल्या चार वर्षांत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी आरोग्य केंद्राचा कायापालट केला आहे. दररोज सुमारे 300 ते 400 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केला जातो. तसेच रुग्णालयामधील रुग्णांवरही मोठय़ा प्रमाणात उपचार केले जातात.
शासनाच्या ‘स्वच्छ, सर्वांग सुंदर दवाखाना’ या उपक्रमासाठी जिल्हास्तरीय निवड कमिटी स्थापन करण्यात आली होती. या निवड कमिटीने विविध आरोग्य केंद्रांची पाहणी केली होती. यात जयसिंगपूर आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. यापूर्वी जयसिंगपूर आरोग्य केंद्राचा जिह्यात तीनवेळा आणि राज्यात 2 वेळा क्रमांक आला आहे.
प्रथम क्रमांक आल्याबद्दल आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांच्याकडून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. एम. एन. सनदी, सुनील हाक्के, अमित काटकर, अमोल कोळी, सचिन धर्माधिकारी, मधुरा बेलवलकर, मीलन महापूरे, केतकी गवळी, धनाजी गायकवाड, विनायक कुंभार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List