Ahilyanagar News – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा

Ahilyanagar News – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतजमीन, शेतपीके, घरे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा योजना, पशुधन तसेच विविध पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीत केंद्र सरकारचे संयुक्त सचिव व केंद्रीय पथकाचे प्रमुख आर. के. पांडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अरविंद वाघमारे, गृह मंत्रालयाचे आशिष गौर, इस्रोच्या एस. एफ. एनआरएससी संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. एस.व्ही.एस.पी. शर्मा, तसेच रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाचे कार्यकारी अभियंता विशाल पांडे हेही उपस्थित होते.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडूरंग गायसमुद्रे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता श्री. पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पॉवर पॉइंटच्या माध्यमातून सादर केला. त्यांनी शेतजमीन व शेतपीकांचे नुकसान, मनुष्यहानी, पशुधन हानी, घरांचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, मदत वितरण, पुनर्वसन कार्य आणि पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीबाबतची माहिती केंद्रीय पथकाला दिली.
५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय पथकाची नुकसानग्रस्त भागांना भेट
केंद्रीय पथक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील विविध नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोस्टा सेव्हिंग अ‍ॅपद्वारे फसवणुकीचे जाळे, अ‍ॅप न वापरण्याचे पोलिसांचे आवाहन कोस्टा सेव्हिंग अ‍ॅपद्वारे फसवणुकीचे जाळे, अ‍ॅप न वापरण्याचे पोलिसांचे आवाहन
‘कोस्टा सेव्हिंग अॅपमध्ये पैसे गुंतवा आणि भरघोस परतावा मिळवा’ असे आमिष दाखवत त्या अॅपच्या माध्यमातून सध्या मोठय़ा प्रमाणात लोकांची आर्थिक...
हाय प्रोटिन सोया-चणाडाळ करी रेसिपी, शाकाहारींसाठी सर्वोत्तम, जाणून घ्या
Ahilyanagar News – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा
माथेरानची राणी पुन्हा धावणार; 6 नोव्हेंबरपासून प्रवासी सेवेत
चक्रीवादळानंतर बचावकार्यासाठी निघालेले लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, 6 जणांचा मृत्यू
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड
निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अंबादास दानवे यांची टीका