सोसायट्यांच्या आवारातूनच आता करणार कचरा संकलन; विमाननगर, भवानी पेठेत यशस्वी प्रयोग

सोसायट्यांच्या आवारातूनच आता करणार कचरा संकलन; विमाननगर, भवानी पेठेत यशस्वी प्रयोग

पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विमाननगर आणि भवानी पेठ परिसरात घरोघरी तयार होणारा कचरा इमारतींच्या खाली तसेच सोसायट्यांच्या प्रवेशव्दारावर गोळा करण्याचा (यांत्रिकीकृत कचरा संकलनाचा) प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा महापालिकेने केला आहे. आता ही पद्धत टप्प्याटप्याने संपूर्ण शहरात लागू करण्याची तयारी सुरू आहे. या प्रयोगामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण कमी झाले असून, घरोघरी संकलन अधिक नियोजनबद्ध झाल्याचा दावा घनकचरा विभाग प्रमुख संदीप कदम यांनी केला. ही पद्धत शहरभर राबवताना कर्मचारी, वाहनांची उपलब्धता आणि तांत्रिक देखभाल या बाबींचे आव्हान असणार आहे.

शहरातील कचऱ्याचे साम्राज्यामुळे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी घनकचरा विभागाची खरडपट्टी काढत कारभार सुधारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर केवळ नवीन प्रकल्पांच्या माध्यमातून ठेकेदाराव्दारे मलई लाटणाऱ्या घनकचरा विभाग कामाला लागला. महापालिका आयुक्त राम यांच्या सूचनेनुसार सुमारे महिन्याभरापूर्वी विमाननगर आणि भवानी पेठ परिसरात राबविलेला यांत्रिकीकृत कचरा संकलनाचा प्रयोग सुरू केला. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या सेवकांचे काम आणि कचरा वाहतूक व्यवस्थेचे वेळापत्रक यांचा एकत्रित विचार करून या प्रणालीची रचना करण्यात आली.

विमाननगरसारख्या नवविकसित भागासोबतच दाट लोकवस्ती असलेल्या भवानी पेठेतही या प्रणालीचा अवलंब करण्यात आला. एकूण 18 मार्गावर कचरा संकलनाची वेळ, वाहनांची फेरफटका आणि जीपीएस ट्रॅकिंग यांची यंत्रणा बसविण्यात आली. यामुळे पूर्वीप्रमाणे फिडर पॉइंटवर कचरा साठून राहण्याचे प्रमाण घटले असून, परिसर तुलनेने स्वच्छ राहिला आहे. यापूर्वी कचरा वेचकांकडून गोळा केलेला कचरा फिडर पॉइंटवर आणला जात असल्याने तेथे अर्धा दिवस ढिगारे तयार होत. या पद्धतीत कचरा संकलनानंतर लगेचच वाहतुकीची सोय करण्यात आली असल्याने फिडर पॉ इंटची गरज कमी झाली आहे.

संदीप कदम म्हणाले, विमाननगर आणि भवानी पेठेत तीस दिवस हा प्रयोग राबविल्यानंतर कचरा वेचक व वाहनचालकांमध्ये जबाबदारीची जाणीव वाढली आहे. या प्रणालीचा विस्तार शहरातील इतर भागांमध्ये, विशेषतः वाघोली परिसरात करण्याचा विचार सुरू असून, आवश्यक साधनसामग्री आणि नियोजनावर काम सुरू आहे.

प्रशासनातील आव्हाने

महापालिकेच्या या योजनेमुळे शहरातील कचरा संकलन अधिक शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी, ही प्रणाली संपूर्ण शहरात अंमलात आणताना कर्मचारी, वाहनांची उपलब्धता आणि तांत्रिक देखभाल या बाबींवर आव्हान राहणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या शहरात कोणत्या रुग्णालयात मिळतात मोफत उपचार, पण कसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती तुमच्या शहरात कोणत्या रुग्णालयात मिळतात मोफत उपचार, पण कसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
PM Ayushman Yojana Find Hospitals: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून अनेक योजना राबवत आहेत. त्यातील एक म्हणजे आयुष्मान भारत...
लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नेत्रदीपक फुलांची सजावट
नरेंद्र मोदींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांनी मदत केली पण त्यांनी त्याचे पांग कसे फेडले ते सर्वांनी बघितलं – संजय राऊत
महाकाल मंदिरात भस्मआरती दरम्यान भक्ताचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी निमलष्करी दलावर मोठा हल्ला; BLA च्या हल्ल्यात 5 सैनिक ठार, दोनजण गंभीर जखमी
मासिक पाळीपूर्वी होतोय हिरवा रक्तस्त्राव? व्हा सावध, डॉक्टरांकडून जाणून घ्या कारण
कामोठ्यात इमारतीला भीषण आग, आई व मुलीचा होरपळून मृत्यू