विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही ICC वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मानधनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण
हिंदुस्थानची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाने ICC Women’s World Cup 2025 मध्ये चमकदार कामगिरी केली. शिवाय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेफाली वर्मासोबत उत्तम फलंदाजी केली. तसेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. मात्र तरीही नुकत्याच आयसीसी एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत स्मृती मानधना पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तर संपूर्ण विश्वचषकामध्ये विस्फोटक फलंदाजी करणारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलवार्ड्ट आयसीसी एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचली आहे.
स्मृती मानधना बराच काळ आयसीसी एकदिवसीय फलंदाज क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. मात्र आता स्मृती 811 रेटिंग पॉईण्ट्सनुसार दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. विश्व चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू होती. स्मृतीने विश्वचषकामध्ये 9 सामन्यांमध्ये 54.25 सरासरीने 434 धावा केल्या. स्मृती मानधना हिंदुस्तानकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली.
महिला विश्वचषक 2025 मध्ये सर्वात जास्त धावा करणारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलवार्ड्ट आयसीसी एकदिवसीय फलंदाज क्रमवारीमध्ये नंबर एक क्रमांकावर आली आहे. लॉराने हिंदुस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामन्यात शतक ठोकले होते. दक्षिण आफ्रिकेकडून लॉराने एकटी खिंड लढवली मात्र, तिची विकेट गेल्याने सामना टीम इंडियाने बाजूने झुकला आणि टीम इंडियाने विश्वचषक उंचावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List