किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष
Kidney आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. मूत्रपिंड हे शरीरातील रक्तच शुद्ध करण्याचे काम करत नाही तर शरीरातील विषारी घटकही बाहेर टाकण्याचे काम करते. रक्तदाब नियंत्रण करण्याचे कामही करते. जेव्हा किडनीची कार्यक्षमता मंदावते. तेव्हा किडनी योग्य काम करत नाही. शरीर त्यासंबंधीचे संकेत देते. पण अनेक लोक या संकेतांकडे कानडोळा करतात अथवा ते गांभीर्याने घेत नाहीत. किडनीचे आजार अचानक मोठे होत नाहीत. तर हळूहळू वाढतात. त्याची लक्षणं इतकी साधी असतात की लोकांना ती जाणवतही नाहीत. जर ही लक्षणं जाणवली तर ती हलक्यात घेऊ नका. त्याकडे कानाडोळ तर अजिबात करू नका. नाहीतर मग आजार अधिक बळावेल.
किडनी आजारी असेल तर दिसतात हे संकेत
सर गंगाराम रुग्णालयातील नेफ्रोलॉजी विभागाचे डॉ. मनिष तिवारी यांनी या लक्षणाविषयी माहिती दिली आहे.
1 वारंवार येणारा थकवा
सतत थकवा येत असेल अथवा शरीरात त्राण राहिला नसेल. कमजोरपणा जाणवत असेल तर किडनी आजारी असल्याचे हे लक्षण आहे. जेव्हा किडनी रक्त योग्य पद्धतीने शुद्ध करत नसेल तर शरीरात विषारी घटक जमा होऊ लागतात. यामुळे व्यक्तीला नेहमी थकल्यासारखं वाटतं. कमजोरी जाणवते. कमी काम केलं तरी त्याला ही लक्षणं जाणवतात.
2 लघवीशी संबंधीत समस्या
लघवीशी संबंधित समस्या जाणवतात. वारंवार लघवीला जावं लागणे, लघवी करताना सतत जळजळ होणे, लघवीतून फेस तयार होणे ही सर्व लक्षणं किडनी खराब होण्याची संकेत आहेत. जर लघवीत रक्त आले तर हा गंभीर संकेत आहे.
3 चेहरा टापसणे, डोळे सुजणे
चेहरा टापसणे, सुजणे, डोळ्यांना सूज दिसणे. जेव्हा किडनीला शरीरातून अतिरिक्त पाणी काढता येत नाही. तेव्हा पाणी शरीरात वाढते. त्यामुळे सकाळी सकाळी डोळ्यांच्या खाली टापसल्या सारखे, सूज आल्यासारखं लक्षणं दिसतं.
4 भूख मंदावणे
भूक कमी लागणे. जेवणाची इच्छा कमी होणे आणि मळमळ होणे. शरीरात विषारी घटकांचे प्रमाण वाढल्यावर त्याचा परिणाम दिसतो. यामुळे जेवणावरील वासना उडते आणि मळमळ आल्यासारखे आणि उल्टी होण्यासारखी लक्षणं दिसतात.
5 त्वचेला खाज येणे. ती रुक्ष होणे
किडनी खराब झाली असेल तर त्वचेला खाज सुटते. ती कोरडी आणि रुक्ष होते. किडनी खनिज आणि पोषकतत्वांचे संतुलन ठेवते. ते काम जर बिघडले तर त्याचा त्वचेवर परिणाम होतो. त्वचा रुक्ष होते.
6 श्वास फुलणे
किडनी खराब झाल्यानंतर शरिरात पाणी साठते. त्यामुळे फुफ्फुसांवर त्याचा दबाव पडतो. रक्तात ऑक्सिजनची मात्रा कमी होते. आणि श्वास फुलतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List