Mumbai News – फूड पार्सलच्या वादातून मित्रांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai News – फूड पार्सलच्या वादातून मित्रांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

फूड पार्सल आणण्याच्या वादातून चार मित्रांनी केलेल्या मारहाणीत 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील अंधेरीच्या साकीनाका परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. मोहम्मद जावेद असिक अली खान असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी चारही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 9 वाजता जरीमारी येथील मुस्लिम सोसायटी परिसरात ही घटना घडली. जावेद खान आणि त्याच्या मित्रांमध्ये फूड पार्सल आणण्यावरून जोरदार वाद सुरू झाला. पाहता पाहता या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. मुख्य आरोपी शेहबाज खानने त्याचे वडील आणि दोन काकांसह जावेद खानला हातांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात जावेदला गंभीर दुखापत झाली.

यानंतर रात्री 10 वाजता जखमी जावेदने त्याचा मित्र अब्दुल कादिर याला फोन करून हल्ल्याची माहिती देत मदतीची याचना केली. कादिरने तात्काळ घटनास्थळी धाव घेत जावेदला एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला सरकारी रुग्णालयात रेफर केले. त्यानंतर कादिरने त्याला कुर्ला येथील भाभा रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी मध्यरात्री 12 वाजता जावेदला मृत घोषित केले.

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी साकीनाका पोलिसांना घटनेची माहिती दिली. जावेदचा मित्र अब्दुल कादिरच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींविरधत हत्या आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड
निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे मुंबई कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एका चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड ठोठावला...
निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अंबादास दानवे यांची टीका
ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही, मग आरामदायी प्रवासासाठी पट्ठ्याने अशी शक्कल लढवली की थेट तुरुंगात रवानगी
Ratnagiri News – भावी नगरसेवकांची आजपासून कसोटी, भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज
Ahilyanagar News – दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात
निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची? आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला – हर्षवर्धन सपकाळ
शिक्षेपूर्वीच दिर्घ तुरुंगवास भोगल्याने हायकोर्टाचा दिलासा, 2011 च्या तिहेरी बॉम्बस्फोटातील आरोपीला जामीन