आठवड्यातून एकदा दारू पिणे सुरक्षित अन् फायदेशीर असते? डॉक्टर याबद्दल काय सांगतात?
दारू पिणे किंवा कोणतेही व्यसन करणे वाईटच. पण असं अनेकदा ऐकलं असेल की काहीवेळेला म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा-दोनदा ड्रिंक करणे तेही अगदी प्रमाणात शरीरासाठी चांगलं असंत. पण त्यातही काही प्रकार असतात. पण हे खरंच असं असतं का? याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घेऊयात.
तर, अनेकांना असे वाटते की आठवड्यातून एकदा दारू पिणे ठीक आहे. पण डॉक्टर म्हणतात की ते खरे नाही. अधूनमधून दारू पिल्यानेही तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचे परिणाम त्याचे प्रमाण, वारंवारता आणि जीवनशैलीवर अवलंबून असते.
आठवड्यातून एकदा दारू पिणे सुरक्षित आहे का?
एका संधिवाताच्या डॉक्टरांनी याबद्दल सांगितले होते की, आठवड्यातून 60 मिली पर्यंत अल्कोहोल पिणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानले जाते. तथापि, जर कोणी अधूनमधून परंतु मोठ्या प्रमाणात अल्कोहोल पित असेल तर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम करू शकते. ते म्हणतात की मर्यादित प्रमाणात अल्कोहोल पिल्याने काही प्रमाणात नुकसान कमी होऊ शकते, परंतु ते पूर्णपणे सुरक्षित मानले जाऊ शकत नाही. जास्त प्रमाणात मद्यपान करणे हे सर्वात धोकादायक आहे. कारण त्यामुळे यकृताचे आजार, हृदयरोग आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. आठवड्यातून फक्त एकदाच पण जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने तुमच्या शरीराचे संतुलन बिघडू शकते.
आठवड्यातून एकदा दारू पिल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
यकृत आणि मूत्रपिंडांवर परिणाम
डॉक्टरांच्या मते, आठवड्यातून एकदा मद्यपान केल्यानेही यकृतावर दबाव येऊ शकतो. दीर्घकाळ सेवन केल्याने फॅटी लिव्हर आणि यकृताच्या इतर समस्या उद्भवू शकतात. अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन देखील होते, ज्यामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
हृदय आणि रक्ताभिसरणावर परिणाम
दारू पिल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. जर एखादी व्यक्ती मद्यपान करताना धूम्रपान करत असेल तर हृदयरोगाचा धोका आणखी वाढतो.
वजनावर परिणाम
अल्कोहोलमध्ये कॅलरीज जास्त असतात. स्नॅक्स किंवा जेवणासोबत ते सेवन केले जाते. त्यामुळे नक्कीच वजन वाढू शकते. विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होते. चयापचय देखील मंदावते, ज्यामुळे वजन नियंत्रित करणे कठीण होते.
झोपेवर परिणाम
अल्कोहोलमुळे लवकर झोप येण्यास मदत होते. परंतु गाढ झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी थकवा, चिडचिड आणि आळस येऊ शकतो, ज्याचा शरीर आणि मन दोन्हीवर परिणाम होतो.
औषधांसह प्रतिक्रिया होऊ शकते
जर तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल, विशेषतः झोपेशी किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित, तर अल्कोहोलमुळे त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतात. ते धोकादायक ठरू शकते. त्यासाठी औषधे घेत असताना अल्कोहोल टाळण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List