नौदलाला बळ मिळणार, इस्त्रो लॉन्च करणार 4400 किलोचा सर्वाधिक वजनदार CMS-03 उपग्रह

नौदलाला बळ मिळणार, इस्त्रो लॉन्च करणार 4400 किलोचा सर्वाधिक वजनदार CMS-03 उपग्रह

‘चांद्रयान-3’ मिशनच्या यशानंतर हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आता बहुप्रतिक्षित CMS-03 सॅटेलाइट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. येत्या रविवारी 2 नोव्हेंबरला हा सॅटेलाइट लॉन्च होणार आहे. इस्त्रो 4400 किलोचा सर्वाधिक वजनदार CMS-03 सॅटेलाइट हा सर्वांत शक्तिशाली रॉकेट LVM-3 या यानाने लॉन्च करणार आहे. CMS-03 हा नौदलासाठी खास विकसित केलेला उपग्रह आहे.

आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च केल्यानंतर हा सॅटेलाईट कम्युनिकेशनच्या भविष्याला नवी दिशा देणार आहे. यामुळे हिंदुस्थानची तंत्रज्ञान क्षेत्रातील शक्ती वाढेल. देशातील कोट्यावधी नागरिकांच्या आयुष्यात डिजीटल क्रांती येईल.

CMS-03 हे नौदलासाठी एक वरदान ठरणार आहे. हा उपग्रह नौदल ऑपरेशन्स, हवाई संरक्षण आणि स्ट्रॅटेजिक कमांड कंट्रोलसाठी उपयुक्त ठरेल. सागरी देखरेख, टेहळणी, नेव्हिगेशन आणि हवामान देखरेख यासारख्या वैशिष्ट्यांमुळे देशाच्या सागरी सुरक्षेला बळ मिळेल. तज्ज्ञांच्या मते, या उपग्रहामुळे दुर्गम भागात डिजिटल जाळे वाढवेल. यामुळे नागरी संस्थांनाही फायदा होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;