रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागते? किडनीचा प्रादुर्भाव तर नाही..ना डॉक्टरचा सल्ला काय?

रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागते? किडनीचा प्रादुर्भाव तर नाही..ना डॉक्टरचा सल्ला काय?

आपल्या शरीरातील प्रत्येक छोटा मोटा बदलाचा काही ना काही अर्थ असतो. हा एखाद्या मोठ्या आजाराचा संकेत देखील असू शकतो. अनेकदा लोक पोट वा लघवीच्या समस्यांना सामान्य समजून नजरअंदाज करत आहे. परंतू डॉक्टरांचे म्हणणे आहे की अशा बदलांकडे लक्ष द्यायला हवे. जर वेळीच यावर लक्ष दिले तर या समस्या छोट्या असतानाच उपचार करुन दूर करता येतात.

काहींना रात्रीचे वारंवार उठून लघवीला जावे लागते.जर तुम्ही यास नॉमर्ल समजत असाल तर तसे नाही. रात्री वारंवार लघवीला येणे एका आजाराचे लक्षण असू शकते. एनेस्थेसियोलॉजिस्ट आणि इंटरवेन्शनल पेन मेडिसिन फिजिशियन डॉ.कुणाल सूद यांनी देखील सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे.

डॉ. सूद यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी जर एनल पेन, ब्लीडींग, लघवी करताना त्रास, किंवा ब्लॅडर नियंत्रण गमावणे सारख्या समस्या मुळव्याध,एनल फिशर, प्रोस्टेटच्या समस्या या नर्व्ह डॅमेजचे संकेत असू शकतात.

ही पाच लक्षणे दुर्लक्षित करु नका

वेदनेसह एनलमध्ये गाठ आणि ब्लिडींग

जर एनलजवळ वेदनेसह गाठ आणि रक्त येत असेल तर हे मुळव्याधाचे (Hemorrhoids)संकेत असू शकतात. डॉ.सूद यांच्या मते अंतर्गत मुळव्याधात दुखत नाही, परंतू रक्तस्राव होतो. तर बाहेरील मुळव्याधात निळसर सुजलेलली गाठ तयार होते. जी बसताना किंवा स्वच्छ करताना दुखते. जर वेदना, गाठ आणि ब्लीडींग होत असेल तर हे थ्रॉम्बोस्ड एक्सटर्नल हेमोरॉयड असू शकते.

तीव्र वेदना आणि रक्तासह मल येणे

जर टॉयलेट करताना तीव्र वेदनेसह लाल रक्त येत असेल तर हा एनल फिशर (Anal Fissure) असू शकतो. गुदद्वाराच्या त्वचेला एक छोटे छीद्र होते. त्यामुळे मल बाहेर येताना तीव्र वेदना होतात. अनेकदा या वेदना तासन् तास होतात.रक्त हलके येत असते.

लघवी करताना त्रास वा कमजोर फ्लो

जर तुम्हा लघवी करताना त्रास होत असेल किंवा लघवीची धार कमजोर असेल हा बेनीन प्रोस्टेटिक हायपरप्लेसिया (BPH) अर्थात प्रोस्टेट वाढल्याचे परिणाम असू शकतात. प्रोस्टेट वाढल्यानंतर मूत्रमार्गावर दबाव येतो. त्यामुळे लघवीचा फ्लोवर परिणाम होतो. हळूहळू ब्लॅडरचे स्नायू देखील कमजोर होता. आणि लघवी थांबून थांबून येते.

रात्री वारंवार लघवीला येणे

रात्रीचे वारंवार लघवीला येणे नॉर्मल नाही. डॉ.सूद यांच्या मते ही ब्लॅडर वा प्रोस्टेटच्या समस्येचे लक्षण असू शकते. पुरुषांमध्ये हे नेहमी BPH वा प्रोस्टेटायटीसच्या कारणाने होऊ शकते. या शिवाय किडनी डिजीस, हार्ट फेल्योर, डायबिटीज वा स्लीप एपनिया सारख्या आजाराच्या कारणाने ही रात्रीत लघवीला वारंवार येते. कारण शरीरात फ्लुईड बॅलन्सला प्रभावित करते.

येथे पाहा पोस्ट –

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Sood, MD (@doctorsoood)

लघवीवर नियंत्रण नसणे

जर तुमच्या लघवीवर तुमचे नियंत्रण नसेल तर हे नर्व्ह वा पेल्विक फ्लोरच्या डॅमेजमुळे देखील होऊ शकते. डॉ. सूद सांगतात की पेल्विक नर्व्ह वा मसल्सच्या खराब झाल्याने ब्लॅडर आणि स्पिंक्सर्सच्या दरम्यानचे ताळमेळ बिघडून जातो. तरही पेल्विक फ्लोर एक्सरसाईजने काही प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
दिवसभर आपण बरीच काम करत असतो, प्रवास करत असतो. धुळ, प्रदूषण यामुळे नक्कीच आपण अनेक जंतूंच्या संपर्कात येतो. मग ते...
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम, एअरस्ट्राईकमध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू
बीडचे वादग्रस्त जेलर पेट्रस गायकवाड यांची बदली