तडीपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आदेश

तडीपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आदेश

अंमली पदार्थांच्या विरोधात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन प्रचार, प्रसिध्दी करावी. अंमली पदार्थ दुष्परिणामाबाबत माहितीपट प्रदर्शित करावा. ज्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तडीपारची प्रलंबित प्रकरणे आहेत , त्यांनी ती प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.

नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागानुसार सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, शिक्षण विभागाने शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस उपअधिक्षक कार्यालयाकडे प्रलं‍बित असणारे तडीपारीचे प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावावेत. सर्व विभागांनी गंभीरपणे अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेवून, सतर्क राहून कारवाई करावी. विशेषत: सागरी मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करावे.

कृषी विभागाने जंगलातील गांजा शेतीचा शोध घ्या

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले की,जंगल भागात गांजाचे पीक घेण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने त्याबाबत तपासणी करावी. पोलीस, कस्टम, उत्पादन शुल्क, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, एमआयडीसी अधिकारी या सर्वांनी अंमली पदार्थ विक्री पेडलर, निर्मिती करणारे कारखाने याबाबत सतर्क राहून तपासणी करावी, संयुक्तपणे कारवाई करावी. नशामुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी नियोजन करुन कारवाई करावी. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;