महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी ही आसने महत्वाची, रामदेवबाबा यांनी सांगितले महत्व
Yoga for mental health: आजच्या काळात महिलांना घर आणि कार्यालय दोन्ही सांभाळावे लागत आहेत. ज्यामुळे मानसिक दबाव वाढत आहे. लागोपाठ कामाचे दडपण, हार्मोन्स बदल, झोपची कतरता आणि स्वत:साठी वेळ न काढू शकल्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे.या शिवाय तणाव, चिंता आणि डिप्रेशन सारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. डिजिटल डिस्टर्बेंस आणि अपुऱ्या झोपमुळे मानसिक संतुलन ढळत आहे. अशा मनाला शांत आणि संतुलित करणे गरजेचे असते,त्यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही निरोगी राहाते. योग या दिशेने एक नैसर्गिक उपाय मानला जात असून त्यामुळे मन स्थिर आणि पॉझिटिव्ह रहाते.
रामदेव बाबा यांच्या मते योगासन शरीरासह मनाला देखील संतुलित राखते. महिला जेव्हा नियमितपणे योगा करतात, तेव्हा त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ज्यामुळे तणाव आणि थकवा दूर होतो. योगाने हार्मोन्स बॅलन्स चांगला रहातो. ज्यामुळे मुड स्विंग्स आणि चिडचिडेपणा कमी होतो. याच सोबत ध्यान आणि प्राणायमने एकाग्रता वाढते आणि मन शांत होते. मानसिक शुद्धी अर्थात मेंटल डिटॉक्ससाठी योग हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे रामदेव बाबा सांगतात. हा केवळ मनलाच नाही तर आत्मा देखील शुद्ध करतो. ज्या महिला रोज काही वेळ योगासाठी देतात त्या महिला मानसिकरुपाने मजबूत आणि संतुलित असतात.
चांगल्या मेंटल हेल्थसाठी महिलांना योगासने करावीत
बालासन
रामदेव बाबा सांगतात की बालासन मनाला तातडीने शांत करणारे आसन मानले जाते. हे डोके आणि माकड हाडातील तणाव कमी करते. आणि गाढ झोपेसाठी मदत करते. ज्या महिलांना मानसिक थकवा किंवा बैचेनी असते, त्यांच्यासाठी हे आसन खूपच फायदेशीर आहे.
विपरीत करनी आसन
हे आसन थकवा दूर करणे आणि ब्लड सर्कुलेशन सुधारण्यात मदत करते. हे आसन चिंता,डोकेदुखी आणि तणावाला कमी करते आणि मनाला हलके करते.
सेतु बंधासन
हे आसन हार्मोनल संतुलन कायम राखते.ज्यामुळे मूड स्विंग्स आणि चिडचिडेपणा कमी होतो. हे आसन शरीरात एनर्जी वाढवते आणि माकड हाडाच्या स्नायूंना मजबूत करते.
शवासन
शवासन मानसिक शांतीचे आसन म्हटले जाते. हे मन आणि शरीर दोन्हींना संपूर्ण आराम देते. डोक्यातील नकारात्मक विचारांना शांत करते. आणि एकाग्रता वाढवण्याच्या क्षमतेला वाढवते.
सुखासन फॉरवर्ड बेंड
हे आसन ध्यान केंद्रित करणे आणि भावनात्मक स्थिरता आणण्यासाठी मदत करते. हे आसन मनाला शांत करते. शरीराला रिलॅक्स करते आणि मानसिक स्पष्टता वाढवते.
या गोष्टींची काळजी घ्या
योगासने नेहमी रिकाम्या पोटी वा हलक्या आहारानंतर करा
सुरुवातीला कोणा चांगल्या योग शिक्षकांची मदत घ्या
रोज किमान २० ते ३० मिनिटे योगासने करावी
झोप पूर्ण करा, संतलित आहार घ्या
मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करा, म्हणजे मेंदूला आराम मिळेल
खोल श्वास घेण्याची सवय करा, याने मानसिक तणाव कमी होतो
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List