जळगावात वाळूमाफियांचा धुमाकूळ, तलाठ्याला ट्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

जळगावात वाळूमाफियांचा धुमाकूळ, तलाठ्याला ट्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्य़ातील चोपड्यात वाळूमाफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून बुधगाव येथे वाळूचोरीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठय़ाला टॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

तापी नदीच्या बुधगाव ते जळोद दरम्यानच्या पुलाखाली वाळूची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर प्रांत अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार हातेड भागातील मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकाऱयांचे पथक रविवारी पहाटे 4 वाजता कारवाईसाठी रवाना झाले. बुधगाव ते जळोद रस्त्यावरील पुलाखाली तापी नदीपात्रात एक ट्रक्टर वाळू भरून येताना दिसला. चालकाची चौकशी केली असता, तो ट्रक्टर अजय कोळी यांचा असल्याचे चालकाने सांगितले आणि पळून गेला.

सदर ट्रक्टर जमा करून चोपडा तहसील कार्यालयात नेत असताना, ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी ट्रक्टरवर बसले होते. यावेळी ट्रक्टर चालक विजय पावरा आणिट्रक्टर मालक अजय कैलास कोळी (दोघेही रा. बुधगाव)यांनी रस्त्यात अडथळा निर्माण केला आणि ट्रक्टर घेऊन जाऊ देणार नाही, असे सांगत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चालक विजय पावरा याने ट्रक्टरवर बसलेल्या अनंत माळी यांची कॉलर पकडून त्यांना खाली ओढले आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने थेट ट्रक्टरच्या मागील चाकासमोर फेकून दिले.

मंडळाधिकाऱ्याच्या प्रसंगावधानाने जीव वाचला

मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी प्रसंगावधान राखून अनंत माळी यांना बाजूला ओढले. त्यामुळे माळी यांचा जीव वाचला. मात्र पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. यानंतर चालक विजय पावरा आणि मालक अजय कोळी यांनी ट्रक्टरमधील वाळू ओतून ट्रक्टर घेऊन पळ काढला. जखमी झालेले ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी यांना उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक्टर चालक विजय पावरा आणि मालक अजय कोळी यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि इतर गंभीर कलमांखाली चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;