Bhandara News – सुट्ट्या पैशांवरून वाद, महिला कंडक्टरची प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
सुट्ट्या पैशांसाठी महिला कंडाक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी बस स्थानकावर घडली. प्रवाशाला लाथा बुक्क्याने मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सुट्ट्या पैशांसाठी महिला कंडाक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी बस स्थानकावर घडली. pic.twitter.com/wWbf9gesBO
— Saamana Online (@SaamanaOnline) October 12, 2025
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला सुट्टे पैसे नसल्याने महिला कंडक्टरने मारहाण केली. त्या महिला कंडाक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील महिला कंडक्टर कडून मारहाणीची दुसरी घटना आहे.
आठ दिवस आधी एका महिला कंडक्टरने विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही घटना समोर आल्याने प्रवाशांन मध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टर वर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवानकडून करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List