स्वयंचलित हवामान केंद्राच्या ‘विडंस्’ प्रकल्पाची फेर ई-निविदा निघणार; ज्यादा दरामुळे निर्णय, 25 हजार ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्र

स्वयंचलित हवामान केंद्राच्या ‘विडंस्’ प्रकल्पाची फेर ई-निविदा निघणार; ज्यादा दरामुळे निर्णय, 25 हजार ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्र

विडंस्  प्रकल्पाअंतर्गत केंद्र सरकारमार्फत राज्यात जवळपास 25 हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत. त्यासाठी वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टिम तथा विडंस् प्रकल्प उभारणीसाठी राबविलेल्या ई- निविदा प्रक्रियेत जादा दराच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. यामुळे फेर ई-निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात ग्रामपंचायत स्तरावर विडंस् प्रकल्प पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार असून त्यास दोन वर्षापर्यंत मुदतवाढ देता येईल. स्वयंचलित हवामान केंद्रातील सेन्सरमुळे पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱयाचा वेग, किमान व कमाल तापमान, वेगाचा वारा, पर्जन्यमान आदींची गावनिहाय माहिती उपलब्ध होणार आहे. अशी माहिती कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी दिली. तांबे म्हणाले, ज्या कंपन्या या फेरनिविदांमध्ये पात्र होतील, त्यांचे पॅनेल करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर देखभालीसाठी एका माणसाची नियुक्ती केली जाणार असून, केंद्र सरकारच्या देखरेखीखाली या प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.

केंद्र सरकारने हा प्रकल्प राबविण्यासाठी तांत्रिक बाबींच्या आधारे पाच कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार राज्यात राबविण्यात आलेल्या ई- निविदा प्रक्रियेमध्ये एका स्वयंचलित हवामान केंद्रासाठी दर महिन्याला साधारणतः 4850 ते 4900 रूपये इतका दर ई- निविदेमध्ये आला आहे. त्यानुसार पाच वर्षासाठी साधारण 800 कोटी प्रकल्प मूल्य होत असून वर्षाला 150 कोटी खर्च या प्रकल्पासाठी येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;