तरुणाला मीम शेअर करणं पडलं महागात, पंचायतीने दिली भयानक शिक्षा

तरुणाला मीम शेअर करणं पडलं महागात,  पंचायतीने दिली भयानक शिक्षा

मध्य प्रदेशच्या जमोह येथे संतापजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावर एक मिम शेअर करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. गावच्या पंचायतने त्या तरुणाला दुसऱ्या तरुणाचे पाय धुऊन तेच पाणी प्यायला भाग पाडले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर काँग्रेसने ही घटना संविधान विरोधी असून सरकारव प्रश्न उपस्थित केले आहेक. ही घटना जनपद पंचायत पटेरा येथील सातरिया गावातील आहे.

तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र तणाव वाढल्यानंतर त्याने पंधरा मिनीटात पोस्ट डिलीट केली आणि सार्वजनिकरित्या माफिही मागितली. मात्र पंचायतने हे प्रकरण संपविले नाही. गावकऱ्यांनी पंचायत बोलावून मिम शेअर करणाऱ्या तरुणाला दुसऱ्या तरुणाचे पाय धुवून ते घाणेरडे पाणी प्यायला भाग पाडले. त्याचबरोबर सर्व समजाची माफी मागायला सांगितली. मात्र आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर या प्रकरणावर टीका केली आहे.

पीडित कुटुंबाने या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.  जिल्हा प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिस अधीक्षकांनी पाटेरा पोलिस ठाण्याच्या प्रभारींना तपास अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे आणि अहवाल मागवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टायर कारखान्यात भीषण स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू; पाच जण जखमी टायर कारखान्यात भीषण स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू; पाच जण जखमी
वेल्डिंगचे काम सुरू असताना बॉयलरचा स्फोट झाल्याने टायर कारखान्यात भीषण आग लागली. या आघीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर...
समृद्धी महामार्गाचा भराव ढासळला, गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पारदर्शी एसआयटी नेमावी, सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी
जुन्या वादातून महाविद्यालयीन तरूणीवर भररस्त्यात अ‍ॅसिड हल्ला, आरोपी फरार
उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, SIR बाबत मोठी घोषणा होणार
युक्रेनची राजधानी कीववर रशियाच्या ड्रोन हल्ला; ३ जणांचा मृत्यू, २९ जण जखमी
नगरमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू