कच्ची कैरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
आॅक्टोबर सुरु झाल्यावर बाजारात आपल्याला कैऱ्या दिसू लागतात. ही कैरी केवळ टाइमपास म्हणून खाण्यासाठी नाही. तर कैरी खाण्याचे खूप आरोग्यवर्धक फायदे आहेत. आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधीतरी आंब्याच्या झाडावर दगड मारुन कैरी पाडली असलेच. आंब्याच्या झाडाशी लहानपणापासून नातं जुळलेलं असतं. कैरी ही कच्ची कैरी ही आरोग्यासाठी फार उत्तम मानली जाते. म्हणूनच कैरी बाजारात दिसू लागल्यावर, कैरी पन्हे, कैरीची चटणी, कैरीचे लोणचे असे विविध पदार्थ घरोघरी होऊ लागतात.
कैरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबरसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. केवळ इतकेच नाही तर, कैरी ही काळ्या मीठासोबत खाल्ल्यास, पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते.
कच्ची कैरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
कैरीमध्ये असलेल्या कॅरोटीनाॅइडमुळे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.
कच्च्या कैरीत व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
मधुमेहाचे रुग्ण असाल तर, कच्ची कैरी खाणे हे अतिशय फायदेशीर आहे. मधुमेही आहारात कच्ची कैरी समाविष्ट करुन, साखरेची पातळी नियंत्रित ठेवु शकतात.
गॅस, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीच्या समस्येत कैरी ही खूप महत्त्वाची मानली जाते. कैरी खाण्यामुळे आपल्या पोटाच्या समस्या नाहीशा व्हायला मदत होते.
कैरीमुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मोठी मदत होते. तसेच रक्ताभिसरण योग्य होण्यास मदत होते.
कैरी ही त्वचेसाठी सुद्धा खूप उत्तम मानली जाते. कैरीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए त्वचेचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत करते.
कैरीत खूप कमी कॅलरीज असल्यामुळे कैरीमुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List