चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

गेल्या दोन वर्षांपासून पुण्याचा लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना आणि त्याच्या ग्रुपने एकापाठोपाठ एकांकिका स्पर्धा जिंकून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतंच. यावर्षी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वच्या सर्व पारितोषिकं ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या एकांकिकेने पटकावली. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना या सर्वच स्तरावर काही नवे प्रयोग त्यात केलेले दिसले. याच एकांकिकेचं पूर्ण लांबीच्या नाटकात केलेलं रुपांतर मराठी रंगभूमीदिनाच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२५ रोजी व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे. चंद्रकांत कुलकर्णी हे नाटक सादर करणार असून, वैशिष्ट्य म्हणजे ओरिजिनल संचातच ही ऊर्जावान रंगकर्मी मंडळी आपल्याला मुख्यधारेतल्या रंगभूमीवर दिसणार आहेत. ‘जिगीषा’ संस्थेची ही निर्मिती असून नाटकाच्या तालमी जोरात सुरु आहेत.

एकांकिका, दीर्घांक स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, समांतर रंगभूमीवरुन व्यावसायिक रंगभूमीवर येण्याचा हा नाट्यप्रवास महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना परिचित आहेच पण अत्यंत सळसळत्या ऊर्जेची, नव्या पिढीची, नव्या दमाची लेखक-दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रींची टीम यानिमित्ताने कार्यरत होते. ‘ऑल दि बेस्ट’, ‘मनोमिलन’ अशा उदाहरणांनी हे घवघवीत यश या आधीही अधोरेखित झाले आहे.

आशय-विषय मांडणीत असलेला हा नव्या पिढीचा दृष्टीकोन नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या रंगमंचीय शक्यतांना सामोरं जाताना दिसतो. नव्या जेन झी पिढीची ही नवलकथा रंगमंचावर आणताना आम्हाला नव्या पिढीशी एक नातं निर्माण करण्याची संधी मिळतेय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वसा देण्याचा आमचा उद्देश आहे, अशी प्रतिक्रिया निर्माते श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव आणि सादरकर्ते चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;