प्रेमाला वयाचं बंधन नसतं…! 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान गायिकेच्या प्रेमात, महिना अखेरीस उडणार लग्नाचा बार

प्रेमाला वयाचं बंधन नसतं…! 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान गायिकेच्या प्रेमात, महिना अखेरीस उडणार लग्नाचा बार

प्रेमाला वयाचे बंधन नसते याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात असेच एक ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले आहे. एक 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान असलेल्या गायिकेच्या प्रेमात पडला आहे. लवकरच ते दोघं लग्नबंघनात अडकणार आहेत.

फोक फ्युजनचा बादशाह आणि द रघु दिक्षित प्रोजेक्टचा गायक रघु दीक्षित वयाच्या 50 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. त्यांची होणारी पत्नी सुप्रसिद्ध गायिका आहे. ती त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. रघु दीक्षित ग्रॅमी नॉमिनेटेड गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपाल हिच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे.

रघु दीक्षित या संगीतकाराने 2005 मध्ये कोरिओग्राफर, नृत्यांगना मयुरी उपाध्यायबरोबर लग्न केले होते. मात्र 2019मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांची ‘म्हैसूर से आयी’ आणि ‘हे भगवान’ गाणी प्रसिद्ध आहेत. रघु दीक्षित यांनी या वृत्ताला दुजोरा देत या महिन्याच्या अखेरीस लग्न करणार असल्याचे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;