पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले
हरिद्वार स्थित पतंजली वेलनेस लोकांना नवे आयुष्य देत आहे. मोठ्या संख्येने विविध रोगांनी आजारी असलेल्यांना नवीन आयुष्य मिळत आहे. अशा लोकांनू आपले अनुभव शेअर केले आहेत.या लोकांचे म्हणणे आहे की पतंजली वेलनेसमध्ये उपचार आणि औषधांना आराम मिळत आहे. पतंजली वेलनेसमध्ये बरे झालेल्या लोकांनी सांगितले की क्यूआर कोड स्कॅन केल्याने तुम्हाला वेलनेस सेंटरमध्ये त्यांचा प्रवेश आणि सुट्ट्यांचा तारखांसह त्यांचा व्हिडीओ फिडबॅक देखील पाहू शकता. चला तर काही लोकांचा अनुभव आपण ऐकूयात ज्यांचे पतंजली वेलनेसने आयुष्य बदलले.
उत्तर प्रदेशातील देवरिया येथील निवासी सुरेश्वर मिश्रा यांनी आपला अनुभव सांगितला आहे. त्यांची कंबर गेल्या १५ वर्षांपासून दुखत होती. गेल्या सहा महिन्यांपासून डाव्या पायात देखील दुखू लागले होते. अनेक उपचार केले परंतू काहीही फरक पडला नव्हता. मी माझ्या ओळखीच्याकडून पतंजली वेलनेस संदर्भात माहिती ऐकली होती त्यामुळे आपण हरिद्वारला आलो. एका आठवड्याच्या आत मला ७० ते ८० टक्के आराम मिळाला. मी लोकांना सांगेन की त्यांनी एकदा तरी येथून उपचार घ्यावेत असे सुरेश्वर मिश्रा यांनी म्हटले आहे.
आधी माझे वजन ९८ किलोग्रॅम होते
असाच काहीसा अनुभव महाराष्ट्राच्या नगर येथील सुनील शिवाजीराव पाटील यांनी सांगितला आहे. पाटील म्हणतात की आधी मला थायरॉईड ६४, बीपी २०० आणि वजन ९८ किलोग्रॅम होते. याचा उपचार केला परंतू काही फरक पडत नव्हता. नंतर मला पतंजली वेलनेस आणि महाराजांबद्दल माहिती मिळाली. मी रोज महाराजजी यांचा कार्यक्रम पाहू लागलो.
ते म्हणाले की मी सकाळी ४ वाजता योगा करु लागलो. त्यामुळे मला आराम मिळण्यास सुरुवात झाली. आता मी पतंजली वेलनेस, हरिद्वारला आला आहे. आता माझा थायरॉईड सामान्य आहे. बीपी जो २०० होता आता १४० ते ८० झाला आहे. वजन जे ९८ किलोग्रॅम होते ते आता ७८ किलोग्रॅम झाले आहे. यासाठी मी महाराजजी यांना धन्यवाद देत आहे.
१५ वर्षांपासून गुडघे दुखीने त्रस्त होतो
पतंजली वेलनेसने दिल्ली निवासी पंकज गुप्ता यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला आहे. पंकज सांगतात की ते गुडघ्याच्या वेदनने १५ वर्षांपासून त्रस्त होते. त्यामुळे मला चालणे – फिरण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी आपण अनेक उपचार घेतले, परंतू काहीही परिणाम झाला नाही. नंतर मी पतंजली वेलनेसमध्ये उपचार करण्यासाठी आलो आणि आता दोन दिवसांपूर्वी श्रृंगी दिली होती.
पंकज गुप्ता सांगतात की श्रृंगी दिल्यानंतर माझ्या गुडघे दुखीचा आजार एकदम बरा झाला. माझ्यासाठी हा मोठा चमत्कार होता. मी येथील उपचाराने आनंदी आहे. असेच काहीसे अनुभव हिमाचल प्रदेशातील इंद्रजीत सिंह, ओदीशाच्या सोनपूर येथील निवासी नरेंद्र कुमार मिश्र, मध्य प्रदेशातील धार येथील निवासी दीपक खंडे आणि पश्चिम बंगालच्या हावडाचे निवासी शिखा भुनिया सह शेकडो लोकांनी व्यक्त केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List