मोफत औषध योजनेअंतर्गत कफ सिरपचे वाटप, सेवन करताच मुले बेशुद्ध; एकाचा मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर

मोफत औषध योजनेअंतर्गत कफ सिरपचे वाटप, सेवन करताच मुले बेशुद्ध; एकाचा मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर

मोफत औषध योजनेअंतर्गत खोकल्याच्या सिरपचे वाटप करण्यात आले होते. हे सिरप प्यायल्यानंतर पाच वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित कुटुंबांच्या तक्रारीनंतर बयानाच्या सामुदायिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. ताराचंद योगी यांनी सिरपचे सेवन केले. त्यानंतर त्यांची देखील प्रकृती बिघडली. राजस्थानमधील सिकर आणि भरतपूर येथे या घटना घडल्या.

बयाना ब्लॉकचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगेंद्र गुर्जर यांनी सांगितले की सिरपमध्ये समस्या असल्याचा संशय आहे. खबरदारी म्हणून, जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये या सिरपचा पुरवठा आणि वितरण करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील खोरी ब्राह्मणन गाव येथे 5 वर्षाचा मुलगा 29 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास खोकल्याचे औषध प्यायला आणि झोपी गेला. सकाळी तो बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्याला तात्काळ एसके रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे एसके हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. केके अग्रवाल यांनी सांगितले.

त्याच रात्री भरतपूरमध्येही तेच सिरप प्यायल्यानंतर तीन वर्षीय मुलगा बेशुद्ध पडला आणि त्याचे हृदयाचे ठोके अनियंत्रित झाले. त्याला जयपूरमधील जेके लोन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृतीही चिंताजनक असून सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘डिजिटल अरेस्ट’ करून श्रीरामपुरातील डॉक्टरला सात कोटींचा गंडा ‘डिजिटल अरेस्ट’ करून श्रीरामपुरातील डॉक्टरला सात कोटींचा गंडा
सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांकडून तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये लुबाडल्याचा धक्कादायक...
प्रेक्षकच आमचे खरे मायबाप! वंदना गुप्ते यांनी सांगितला एका अनोख्या सहीचा किस्सा
याद्यांमध्ये गोंधळ तरी तीच यादी कशी वापरता? राज ठाकरे यांचा सवाल
व्हीव्हीपॅट लावा नाहीतर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांची मागणी
बदलत्या वातावरणाला सामोरे जाताना आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत
पांढरे सोने फुलले; कमी भावामुळे शेतकऱ्यांवर संकट
संग्राम जगताप यांना दौरा रद्द करून मुंबईत हजर राहण्याचे आदेश