चिमुकल्या प्राणगीपाठोपाठ तिची मावशीही गेली; डोंबिवलीत सर्पदंशाचे दोन बळी
डोंबिवलीत दोन दिवसांपूर्वी चिमुकलीसह तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता. यामध्ये चिमुकल्या प्राणगीचा रविवारी मृत्यू झाला, तर मावशीवर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर कळवा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान आज मावशीचाही मृत्यू झाला. श्रुती ठाकूर (२३) असे मृत तरुणीचे नाव आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे श्रुतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या दालनात गोंधळ घातला.
आजदे गावातील विकी भोईर यांची चार वर्षांची प्राणगी शनिवारी खंबाला राहाणाऱ्या मावशीकडे सुट्टीसाठी गेली होती. रात्री झोपेत दोघींनाही सर्पदंश झाला. त्यांना तातडीने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान प्राणगीचा मृत्यू झाला, तर मावशीची प्रकृती गंभीर झाल्याने शास्त्रीनगर रुग्णालयातून कळवा हॉस्पिटलमध्ये हल विण्यात आले होते. मात्र अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान तिचा आज मूत्य झाला.
दरम्यान, या दोघींवर शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य ते उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू मृत्यू झाल्याचा इ आरोप कुटुंबीयांनी केला आहे. रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी सर्व खासगी दवाखान्यांमध्ये सर्पदंशावरील लस उपलब्ध करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सुधीर बामरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे
नातेवाईकांचा पालिकेत गोंधळ
कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. प्राणगी आणि श्रुती यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करा अशी मागणी केली. जवळपास दोन तास हा गोंधळ सुरू होता. अखेर या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List