दीपेश देवदत्तचा कांगारूंना ‘पंच’, हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला 243 धावांवर रोखले

दीपेश देवदत्तचा कांगारूंना ‘पंच’, हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला 243 धावांवर रोखले

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या पहिल्या युवा कसोटी क्रिकेट सामन्यात दमदार सुरुवात केली. वेगवान गोलंदाज दीपेश देवदत्तच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया युवा संघाचा पहिला डाव 243 धावांतच गारद झाला.

तामीळनाडूच्या 17 वर्षीय दीपेश देवदत्त या गोलंदाजाने 5 विकेट टिपत ऑस्ट्रेलियाला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला 30 धावांत दोन फलंदाज गमावले. दीपेश व किशन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. ऑफस्पिनर अनमोलजित सिंगने कर्णधार विल मलाझुकला (21) माघारी धाडले. त्यामुळे पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाची 3 बाद 78 अशी दुर्दशा झाली. त्यानंतर खिलन पटेल व दीपेश यांनी हॉलिक आणि यष्टिरक्षक सायमन बज यांना बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 167 अशी झाली.

ऑस्ट्रेलियासाठी आघाडीच्या फळीतील स्टीव्हन होगनने 246 चेंडूंत 92 धावांची संयमी खेळी करत संघाला सावरण्याचे काम केले, मात्र इतर फलंदाज हिंदुस्थानी गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱयापुढे टिकू शकले नाहीत.  हॉलिकने 94 चेंडूंत 38 धावा करून दुसरे सर्वोच्च योगदान दिले. अखेर ऑस्ट्रेलिया युवा संघाचा डाव 91.2 षटकांत 243 धावांवर संपुष्टात आला.

हिंदुस्थान युवा संघाकडून दीपेश देवदत्तने 16.2 षटकांत केवळ 45 धावांच्या मोबदल्यात 5 फलंदाज टिपले, तर किशन कुमारनेही 16 षटकांत 48 धावा देत 3 गडी टिपत उत्तम साथ दिली. याचबरोबर अनमोलजित सिंग व खिलन पटेल यांनी 1-1 फलंदाज बाद केला.

यापूर्वी झालेल्या युवा एकदिवसीय मालिकेतही हिंदुस्थानने आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली 3-0 असे निर्भेळ यश मिळविले होते.  हिंदुस्थानने पहिला सामना 57 धावांनी, दुसरा 51 धावांनी आणि तिसरा 167 धावांनी जिंकला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधुमेह असणारे दूध पिऊ शकतात का? की दुधाच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अजून वाढतं? मधुमेह असणारे दूध पिऊ शकतात का? की दुधाच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अजून वाढतं?
ज्यांना शुगर आहे म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे त्यांना त्यांच्या खाण्या-पिण्याबद्दल फार खाळजी घ्यावी लागते. मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहाराबद्दल कूप काळजी...
दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन झाला वाद, दुसऱ्याने केले भयंकर कृत्य
मुंबई एसटी बँकेत संचालकांमध्ये राडा, मिंधे गट आणि सदावर्तेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
Bihar Election 2025 -पैसे, मोफत वस्तू, अमली पदार्थ आणि दारु वापराबाबत सतर्क राहा; निवडणूक आयोगाच्या कडक सूचना
Ratnagiri News – संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना वादळी पावसाने झोडपले, भात कापणीवर परिणाम
बाजार समिती चौकशी समितीचे प्राधिकृत अधिकारी प्रकाश जगताप यांना अखेर हटवले, सहनिबंधक योगीराज सुर्वे आता प्राधिकृत अधिकारी
गाझामध्ये हमासची पुन्हा एकदा क्रूरता, भरचौकात 8 जणांवर झाडल्या गोळ्या