Ratnagiri News – खंडाळा खून प्रकरणातील संशयित आरोपी दर्शन पाटीलचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

Ratnagiri News – खंडाळा खून प्रकरणातील संशयित आरोपी दर्शन पाटीलचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी येथील जयगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तिहेरी खूनप्रकरणातील संशयित दर्शन शांताराम पाटील (57) याचा उपचारादरम्यान मुंबईमधील जे.जे. रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. प्रकृती ठिक नसल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाने 23 सप्टेंबर रोजी त्याला जामीन मंजूर केला होता.

मृत सीताराम वीरच्या हत्येप्रकरणी दर्शन पाटीलवर भारतीय न्याय संहिता कलम 302, 201, 109 सह 34 भा.दं.सं. नुसार गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर मुलाला खून करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असून पोलिसांच्या अटकेनंतर दर्शन पाटीलची प्रकृती अत्यंत खालावली होती. सुरुवातीला त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. वैद्यकीय अहवालांनुसार, तो ‘मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम’ने ग्रस्त असल्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

दरम्यान, दर्शन पाटीलच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने दर्शन पाटील हा गंभीर आजारी असल्याचे मान्य केले. त्यानुसार, न्यायालयाने वैयक्तिक 50 हजार रुपयांच्या जामिनावर आणि तितक्याच रकमेच्या हमीवर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;