मीरा-भाईंदर पालिकेच्या नळातून गटाराचे पाणी, उत्तनवासीयांचे आरोग्य धोक्यात

मीरा-भाईंदर पालिकेच्या नळातून गटाराचे पाणी, उत्तनवासीयांचे आरोग्य धोक्यात

मीरा-भाईंदर पालिकेच्या नळातून गटाराच्या काळ्याकुट्ट पाण्याचा पुरवठा होत असल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या फेसाळलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दूषित पाण्यामुळे उत्तनवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. पालिकेने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी उत्तनवासीयांनी केली आहे.

भाईंदर पश्चिमेतील उत्तनच्या पाली बंदर व शांतीनगर परिसरात महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून गटाराचे पाणी येत आहे. काळ्याकुट्ट पाण्यामुळे येथील नागरिक हैराण झाले असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. केवळ पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. ही वाहिनी दुरुस्त करून तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक दत्तात्रय जाधव यांनी महापालिकेकडे केली. संतप्त रहिवाशांनी पाणीपुरवठा विभागाला याची माहिती देत जाब विचारला असता अधिकाऱ्यांची पळापळ झाली. प्रभागात रस्ता आणि गटार बांधण्याचे काम सुरू असल्यामुळे लिकेज पाइपलाइनमुळे गटाराचे पाणी येत असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

गळक्या पाइपचा शोध सुरू

गळक्या पाइपलाइनचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी इंजिनीयरसह एका पथकाची रवानगी केले आहे. या पथकाकडून गळक्या पाइपलाइन, गटाराजवळील व्हॉल्व याचा तपास सुरू केला आहे. लवकरच लिकेज शोधून त्यावर उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या
हिंदू धर्मात अन्नाला देवाचे रूप मानले जाते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हटलं जातं. त्याला पाय लागला किंवा एखादा भाताचा कण देखीला...
महिनाभर भात सोडल्याने खरंच वजन कमी होते का? शरीरात काय बदल दिसतात?
मुंबई गिळायाचा प्रयत्न करणाऱ्या अ‍ॅनाकोंडाचं पोट फाडून बाहेर येईन; निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे मोदी, शहांवर बरसले
निवडणूक मतदार यादीत गडबड, आदित्य ठाकरेंनी मांडली वरळी मतदारसंघातील बोगस मतदार आकडेवारी
ट्रम्प लोकांचा आवाज दाबून त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, जो बायडेन यांची टीका
फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? 90% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या, नंतर फळे खरेदी करताना तुम्हीही चेक कराल स्टिकर
भाजपच्या बॅनरवर अमित शहा लोहपुरुष ! रोहीत पवार यांनी केली टीका