फिलीपाइन्स भूकंपाने हादरले; रिश्टर स्केलवर 5.7 तीव्रतेची नोंद

फिलीपाइन्स भूकंपाने हादरले; रिश्टर स्केलवर 5.7 तीव्रतेची नोंद

फिलिपाइन्स पुन्हा एकदा भूंकपाने हादरले असून तिथे रविवारी रात्री पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. लेयट बेटाच्या किनाऱ्यावर 5.7 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5.05 वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्र टाम्बोंगोनच्या नैऋत्येला सुमारे २ किलोमीटर अंतरावर आणि १० किलोमीटर खोलीवर होते. मात्र, अद्याप कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

लेयटे आणि मध्य विसायासमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, आतापर्यंत कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपानंतरच्या धक्क्यांच्या अंदाजाने अधिकाऱ्यांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क केले आहे. इमारती आणि पुलांची तपासणी करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

याआधी 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपातून देश सावरत असताना पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या भूकंपानंतर मिंडानाओ प्रदेशात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची खोली सुमारे 62 किलोमीटर होती, ज्यामुळे इंडोनेशियाने त्यांच्या उत्तर सुलावेसी आणि पापुआ प्रदेशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.

गेल्या महिन्यात फिलीपाइन्समध्ये सर्वात भीषण भूकंपाचा धक्का बसला होता. तेव्हा सेबू बेटाजवळ 6.9 रिश्टर स्केलच्या भूकंपात किमान 72 लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो इमारतींचे नुकसान झाले होते. भूगर्भीय बदलामुळे फिलीपाइन्सला सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याचे तजज्ञांनी सांगितले. हा देश पॅसिफिक महासागरातील “रिंग ऑफ फायर” मध्ये आहे. जिथे अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना भिडतात. या प्लेट्सच्या हालचालींमुळे, फिलीपाइन्स हा जगातील सर्वात भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. सध्या, स्थानिक अधिकाऱ्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? 90% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या, नंतर फळे खरेदी करताना तुम्हीही चेक कराल स्टिकर फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? 90% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या, नंतर फळे खरेदी करताना तुम्हीही चेक कराल स्टिकर
फळे खरेदी करताना आपण अनेकदा असं पाहिलं असेल की, काही फळांवर स्टिकर लावलेले असतात. फळे खरेदी कराताना आपण फक्त फळं...
भाजपच्या बॅनरवर अमित शहा लोहपुरुष ! रोहीत पवार यांनी केली टीका
पुणे बाजार समितीकडून ठराविक व्यापाऱ्यांना पुन्हा भूखंड वाटपाचा घाट
ICC Women’s World Cup – सेमी फायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा हादरा, सलामीची विस्फोटक फलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर
अखेर 14 वर्षांचा संसार मोडला! टिव्ही इंडस्ट्रीतले जय भानूशाली आणि माही वीज झाले विभक्त
देशातील १२ राज्यांमध्ये सुरु होणार SIR चा दुसरा टप्पा, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
आधीच्या प्रियकरासोबत मिळून तरुणीने केली लिव्ह इन पार्टनरची हत्या, असा झाला खुलासा