अन्यायाला गाडायला ठाण्यात शिवसेना आणि मनसेचा संयुक्त धडक मोर्चा
ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी ठाणेकर नागरिकांच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका दरम्यान सोमवारी दुपारी 3:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महामोर्चाचा मार्ग
गडकरी रंगायतन ते साईकृपा हॉटेल-उजवीकडे न्यू इंग्लिश स्कूल डावीकडे मढवी यांच्या बंगल्या वरून उजवीकडे घंटाळी नाका-साईबाबा मंदिर-तीन पेट्रोल पंप-आराधना टॉकीज-रायगड गल्ली-चंदनवाडी शाखा ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय. असं असणार आहे. या मोर्चासाठी सर्व ठाणेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी, अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी…!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांचा धडक मोर्चा!सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५ । दुपारी ३ वाजता.
ठिकाण: गडकरी रंगायतन समोर, तलावपाळी, ठाणेसर्व ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा! pic.twitter.com/IgdOYWjNG0
— Rajan Vichare – राजन विचारे (@rajanvichare) October 12, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List