कंबरदुखीपासून मिळेल आराम, रामदेव बाबांनी सांगितलेली योगासने रोज करा

कंबरदुखीपासून मिळेल आराम, रामदेव बाबांनी सांगितलेली योगासने रोज करा

बराच काळ एकाच जागी बसल्याने किंवा मोठे वजन उचलल्याने कंबर आणि पाठदुखीची समस्या सुरु होत असते. पुरुष असो वा महिला ही समस्या दोघांमध्ये पाहायला मिळत आहे. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करत असतात. परंतू नंतर ही समस्या गंभीर स्वरुप धारण करु शकते. सर्वसाधारणपणे कंबरदुखीसाठी औषधे किंवा पेन रिलीफ स्प्रेचा अनेक जण वापर करत असतात. परंतू तुम्ही नैसर्गिक आणि कायमस्वरुपी उपायाच्या शोधात असाल तर योगासने एक चांगला पर्याय ठरु शकत आहे. योगगुरु बाबा रामदेव नेहमीच योगाच्याबद्दल लोकांना जागरुक करत आले आहेत.

बाबा रामदेव यांच्या मते योगाद्वारे अनेक आजारांवर उपाय शक्य आहे. एवढेच नव्हे तर बाबा रामदेव यांनी योगावर एक पुस्तक देखील लिहिले आहे. ज्याचे नाव आहे Yog Its Philosophy & Practice. या शिवाय बाबा रामदेव यांनी सोशल मीडियावर शेअर करीत योग शिकवत आहेत. चला तर पाहूयात कंबर दुखीवर कोणती आसने फायदेशीर ठरतील ?

1. उष्ट्रासन ( ऊंट मुद्रा )

कंबर दुखीवर आराम मिळण्यासाठी योगासनाचा खूपच फायदा होत असतो. यास करण्यासाठी शरीरास पाठच्या बाजूला झुकवावे लागते. यामुळे कंबरेला स्ट्रेच होतो,त्यामुळे कंबर मजबूत आणि फ्लेक्सिबल बनते. हे आसन करताना गुडघ्यात दुखू शकते. त्यामुळे तुम्ही गादीचा वापर करु शकता.

2. भुजंगासन ( कोब्रा मुद्रा )

हे आसान कंबरेला मजबूत करण्यासह पोट बारीक करण्यासाठी देखील लाभदायक असते. हे आसन करण्यासाठी आधी पोटावर झोपावे आणि मान वर उचलण्याचा प्रयत्न करावा. या योगासनाने माकड हाडाचे स्ट्रेचिंग होते आणि पाठी दुखीपासून आराम मिळतो. जर पोट बाहेर आले असेल तरीही हे योगासन तुम्ही करु शकता.

3. शलभासन (टिड्डी मुद्रा)

शलभासन देखील माकड हाड मजबूत करण्यासाठी सहायक असते. तसेच हे आसन केल्याने पोटाची चरबी देखील कमी होण्यास मदत मिळते. या योगासन करण्यासाठी एक – एक पाय पाठून वर उचलला जातो. जर तुम्ही रोज हे आसन करत असाल तर पोट आणि कंबर दोन्ही आरोग्यपूर्ण राहाण्यास याची मदत मिळते.

4. धनुरासन (धनुष मुद्रा)

कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी रोज तुम्ही धनुरासनचा अभ्यास करु शकता. यास केल्याने फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि पचन चांगले होते. या आसनाला करण्यासाठी पोटावर झोपायचे आणि दोन्ही पायांना हातांनी धरायचे असते. त्यातून धनुष्याचा आकार तयार करायचा असतो. सुरुवातीला हे आसन थोडे अवघड वाटेल, परंतू रोज केल्याने तुम्हाला याची सवय होईल.

5. मर्कटासन (माकड मुद्रा)

मर्कटासन कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी सर्वात असरदार मानले जाते. यात घुडगे आणि पंजांना जवळ मोडून उजवीकडे आणि मानेला डावीकडे वळवावे. याने माकड हाडाचे स्ट्रेचिंग होते आणि पाठदुखीपासून लागलीच आराम मिळतो. मर्कटासनला अनेक वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू; 13 जण जखमी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू; 13 जण जखमी
अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना समोर आली आहे. नॉर्थ कॅरोलिनात विकेंड पार्टीदरम्यान अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला...
संपूर्ण जीवनात महिला किती किलो लिपस्टीक खातात ? जाणून बसेल धक्का
भारतात श्वास घेणंही कठीण, प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षांत 38 लाख जणांचा मृत्यू
एमडी होण्याचे स्वप्न भंगले… शैक्षणिक कर्जही फिटले नाही; आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
औषध कंपन्यांनी भाजपला ९४५ कोटी रुपयांची दिली देणगी, सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल दिग्विजय सिंह यांचा दावा
भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी; निर्णयाकडे देशभरातील प्राणीप्रेमींचे लक्ष
गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा