भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या 8 जणांना चिरडले, 5 जणांचा जागीच मृत्यू; तिघांची प्रकृती चिंताजनक

भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या 8 जणांना चिरडले, 5 जणांचा जागीच मृत्यू; तिघांची प्रकृती चिंताजनक

भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या आठ जणांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कारने दुचाकीसह रस्त्यावरून चालणाऱ्या अनेकांनाही धडक दिली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कारचालकालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

उत्तर प्रदेशातील आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अपघातानंतर जमावाने कार चालकाला बेदम चोपले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले आणि चालकाला ताब्यात घेतले. चालकाची वैद्यकीय तपासणी करत आहेत. गंभीर जखमींवर एसएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;