मासे खाल्ल्यानंतर आइस्क्रीम खाणे कितपत सुरक्षित? विषबाधा होऊ शकते का?
अनेकांना मांसाहारमध्ये मटण-चिकनपेक्षाही मासे खाणे खूप आवडते. पण त्याचसोबत मांसाहार केला की अनेकांना काहीतरी गोड किंवा थंड आइस्क्रिम खाण्याची इच्छा होते. मासे खाल्ल्यानंतर दूध, चहा वैगरे पिऊ नये हे सर्वांनाच माहित आहे. पण मासे खाल्ल्यानंतर आइस्क्रिम खाल्ले तर चालते का? त्याच्यामुळे काही समस्या तर होणार नाहीत ना? याबद्दल अनेकांना माहित नसते. तुम्हालाही मांसाहार किंवा मासे खाल्ल्यानंतर आइस्क्रिम खायला आवडत असेल तर हे जाणून घ्याच.
मासे खाणे आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी असले तरी, ते खाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
मासे खाल्ल्यानंतर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत मासे खाऊ नयेत. त्यामुळे पोटाच्या समस्या तसेच त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पण मासे खाल्ल्यानंतर आइस्क्रीम खाऊ शकता परंतु काही लोकांना पचनाच्या समस्याही होऊ शकतात. विशेषतः जर तुमची पचनक्रिया संवेदनशील असेल किंवा तुम्हाला विशिष्ट एलर्जी असेल तर त्याचे लगेच परिणाम जाणवू शकतात.
मासे खाल्ल्यानंतर आइस्क्रीम खाण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवा
थोड्या वेळाने खा : मासे खाल्ल्यानंतर आइस्क्रीम खाण्यासाठी काही वेळ जाऊ द्या. मासे खाल्ल्यानंतर लगेचच आइस्क्रीम खाण्याऐवजी किमान एक ते दीड तास थांबण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या शरीराकडे लक्ष द्या : जर मासे खाल्ल्यानंतर तुम्ही आइस्क्रीम खाल्ले आणि त्यानंतर तुम्हाला काही अस्वस्थता वाटत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.आणि नंतर असे करणे टाळा.
एलर्जी किंवा संवेदनशीलता : जर तुम्हाला कोणतीही एलर्जी असेल किंवा तुमची पचनक्रिया संवेदनशील असेल, तर दोन्ही एकत्र खाणे टाळा. किंवा शक्य असल्यास मासे खाल्ल्यानंतर दूधाचे पदार्थही खाणे टाळणे चांगले म्हणून आइस्क्रीम खाणे टाळलेले कधीही चांगले.
तसेच मासे खाल्ल्यानंतर या पदार्थांचे देखील सेवन करणे टाळा
दूध किंवा दुग्धजन्य : मासे खाल्ल्यानंतर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे. काही लोक दही किंवा दुधात मासे शिजवतात. हे योग्य नाही. दूध, दही किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांसोबत मासे खाणे पचनासाठी चांगले नाही. यामुळे अपचन, पोटफुगी, पोटदुखी, त्वचेचे संक्रमण आणि त्वचेवर पांढरे डाग यासह इतर समस्या उद्भवू शकतात. यामुळे पचनसंस्थेच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
लिंबूवर्गीय फळ : लिंबूवर्गीय फळांसह मासे खाणे टाळा. जर तुम्ही मासे खात असाल तर त्यासोबत लिंबूवर्गीय फळे खाणे टाळा. काही लोक सॅलडमध्ये लिंबूवर्गीय फळे घालतात आणि माशासोबत खातात. या फळांपासून बनवलेला रस देखील टाळा. मासे आणि लिंबूवर्गीय फळांचे मिश्रण आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. लिंबू, संत्री, टोमॅटो आणि किवी सारखी लिंबूवर्गीय फळे आम्लयुक्त असतात. मासे हे प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहे. जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र येतात तेव्हा ते प्रतिक्रिया देऊ शकतात, ज्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
बटाटे आणि पास्ता : बटाटे आणि पास्ता सारख्या जास्त स्टार्चयुक्त पदार्थांसह मासे खाणे देखील टाळावे. यामुळे जास्त कॅलरी आणि कार्बोहायड्रेटचे सेवन होऊ शकते. यामुळे पचनसंस्था मंद आणि मंद होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही जे काही खात आहात ते पचवणे कठीण होते.
चहा आणि कॉफी : काही लोक जेवताना चहा आणि कॉफी पितात. मासे खाताना कॉफी पिणे हे एक अस्वास्थ्यकर अन्न संयोजन असू शकते. यामुळे शरीर माशांमध्ये असलेले पारा योग्यरित्या शोषण्यापासून रोखू शकते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List