हे 3 पदार्थ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत; पोटाच्या समस्या वाढवू शकतात

हे 3 पदार्थ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत; पोटाच्या समस्या वाढवू शकतात

सकाळी प्रत्येकाची दिनचर्या ही वेगवेगळी असते. अनेकजण हलका नाश्ता घेऊन दिवसाची सुरुवात करतात. तर काहींना सकाळी फ्रेश झाल्याबरोबर पहिला चहा लागतो ती लोक चहाने सकाळ सुरुवात करतात. तर अनेकजण कॉफी घेतता. तर काहीजण फळांनी दिवसाची सुरुवात करतात. पण असे काही पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी कधीच खाल्ले नाही पाहिजेत. अन्यथा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जसं की, आम्लता, पोटफुगी आणि ऊर्जा कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

तज्ज्ञांच्या मते सकाळी उठल्यानंतर लगेच खाल्लेले काही पदार्थ पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात आणि दिवसभर त्याचा परिणाम तुमच्या उर्जेच्या पातळीवर होतो. तज्ज्ञांच्या मते, हे तीन पदार्थ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. कारण ते तुमच्या आतड्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊयात की असे कोणते 3 पदार्थ आहेत जे सकाळी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत.

आंबट फळे

सकाळी उठल्यानंतर आंबट फळे खाणे टाळावे जसंल की, संत्री आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीने समृद्ध आणि आरोग्यदायी असतात, परंतु रिकाम्या पोटी ती खाणे योग्य नाही. ते जास्त आम्लयुक्त असल्याने पोटाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ आणि गॅस होऊ शकतो. ज्यांना आधीच पोट किंवा आम्लपित्त समस्या आहेत त्यांनी सकाळी ही फळे टाळावीत.

ब्लॅक कॉफी

अनेकांना दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने करायला आवडते. सकाळी ऊर्जा वाढवण्यासाठी अनेकांना कॉफी आवडते, परंतु रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे अ‍ॅसिड निर्माण करू शकते. ब्लॅक कॉफी अचानक पोटातील अ‍ॅसिड वाढवते, ज्यामुळे केवळ छातीत जळजळच नाही तर पोट फुगणे, अस्वस्थता आणि ऊर्जा कमी होते. शिवाय, कॉफीमध्ये कॅफिन असते, जे शरीरात कॉर्टिसोल, स्ट्रेस हार्मोन वाढवते, जे शरीराचे नैसर्गिक ऊर्जा संतुलन बिघडू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कधीही ब्लॅक कॉफी घेऊ नये.

जड, तळलेले पदार्थ

सकाळी जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर अनावश्यक ताण पडतो. यामुळे गॅस, अपचन आणि दिवसभर जडपणा जाणवू शकतो. तळलेले पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि मसाल्यांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटफुगी आणि आम्लता वाढू शकते. त्यामुळे सकाळी कामात सुस्तपणा आणि थकवा देखील निर्माण करतात.

मग दिवसाची सुरुवात कशाने करावी? जेणे करून तुम्ही ताजेतवाने राहाल, ऊर्जेने भरपूर राहाल शिवाय आरोग्यालाही फायदेशीर असेल. जाणून घेऊयात.

दिवसाची सुरुवात कशी करावी?

दिवसाची सुरुवात हलक्या आणि पौष्टिक पदार्थाने करणे चांगले. ब्रेड त्यात ब्राऊन ब्रेड योग्य आणि ऑम्लेट, इडली आणि सांबार, डोसा आणि सांबार, पोहे, उकडलेली अंडी, केळी किंवा सफरचंद अशा हलक्या नाश्ताने सकाळची सुरुवात करावी. तसेच भिजवलेले काजू, ओट्स किंवा केळी देखील आतड्यांच्या आरोग्यास मदत करते. तुम्ही उठताच लिंबू पाण्याऐवजी कोमट पाणी किंवा साधे पाणी देखील पिऊ शकता, जे शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करते आणि पचन सुधारते.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत? कॅरेबियन समुद्रात तैनात केले हजारो सैनिक आणि 75 लढाऊ विमानं अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत? कॅरेबियन समुद्रात तैनात केले हजारो सैनिक आणि 75 लढाऊ विमानं
अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव वाढत चालला आहे. अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त असून याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने कॅरेबियन समुद्रामध्ये...
1 नोव्हेंबरपासून नवे नियम नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम; गॅस सिलेंडर, एसबीआय कार्ड नियमापासून म्युच्युअल फंडापर्यंत बदल होणार
शुभवार्ता! गगनयानचे 90 टक्के काम पूर्ण, इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती
सीईओ सत्या नडेला यांना 846 कोटींचे पॅकेज, एआयमध्ये उल्लेखनीय कामगिरीमुळे बक्षीस
शेअर बाजार नफेखोरीमुळे कोसळला
इलॉन मस्कची ‘स्टारलिंक’ हिंदुस्थानासाठी तयार, मुंबईसह नऊ शहरात इंटरनेटचे नवे नेटवर्क
यूपीआयसाठी आता नवीन एआय हेल्प असिस्टेंट