शेअर बाजार नफेखोरीमुळे कोसळला

शेअर बाजार नफेखोरीमुळे कोसळला

हिंदुस्थानी शेअर बाजारात शुक्रवारी नफेखोरी पाहायला मिळाली. यामुळे हिंदुस्थानी शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत घसरण झाली. शुक्रवारी दिवसभर चढ आणि उतारानंतर अखेर सेन्सेक्स 345 अंकांनी घसरून 84,212 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 96 अंकांच्या घसरणीसोबत 25,795 अंकांवर बंद झाला. हिंदुस्थान-अमेरिका यांच्यातील व्यापार डीलसंबंधमध्ये अनिश्चितता निर्माण झाल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. निफ्टीतील 50 पैकी 33 स्टॉक्सचे शेअर्स घसरले, तर दुसरीकडे मेटल सेक्टरमध्ये चमक दिसली. हिंडाल्को इंडस्ट्री, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये चांगली खरेदी दिसली. बँकिंग आणि ऑटोच्या शेअर्समध्ये घसरण झाली. कोटक महिंद्रा बँकेचे जवळपास दोन टक्के शेअर्स घसरले. सुप्रीम इंडस्ट्रीजमध्येही 3 टक्के घसरण झाली. अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली.

घसरणीमागील प्रमुख कारणे

शेअर बाजारात घसरणीमागे सर्वात मोठी तीन कारणे सांगितली जात आहेत. यात सर्वात प्रमुख कारण नफेखोरी, विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री आणि वोलेटिबिटीमध्ये वाढ ही आहेत. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील अखेरच्या टप्प्यात थंड पडली आहे. तसेच केंद्र सरकारकडून यावर कोणतेही भाष्य करण्यात न आल्याने गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री केली. विदेशी गुंतवणूकदारांनी मागचा पुढचा विचार न करता शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली. निफ्टीमध्ये सोमवारीही नफेखोरी पाहायला मिळू शकते. निफ्टीने 25800 च्या लेवल खाली क्लोजिंग दिल्याने हे संकेत दिले आहे की, इंडेक्समध्ये यापुढेही हे चित्र दिसू शकते. गेल्या दोन दिवसात 300 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;