प्रवासी जीप 700 फूट खोल दरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू; 10 गंभीर जखमी
प्रवासी जीप 700 फूट दरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात जीपमधील आठ जणांचा मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले. नेपाळच्या कर्नाली प्रांतात शुक्रवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. हा अत्यंत कठीण भूभाग असल्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचण आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रुकुम पश्चिम जिल्ह्यातील बाफिकोट भागातील झारमारे परिसरात हा अपघात झाला. जीप मुसीकोटमधील खलंगा बाजार येथून स्यालीखारी गावाकडे जात होती. जीपमध्ये एकूण 18 प्रवासी होते. रात्रीच्या अंधारात वळणदार रस्त्यावर जीपचा ताबा सुटला आणि ती खोल दरीत पडली.
चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. जीपचा वेग जास्त असल्याने अपघाताची घटना घडल्याने पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या मते, सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी स्थानिक रुग्णालयात पोहोचताच मरण पावला. मृतांचे वय 15 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी बहुतेक तरुण कामासाठी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करत होते.
मृतांमध्ये स्थानिक शेतकरी, विद्यार्थी आणि मजूर यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने रुकुम जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कर्नालीसारख्या प्रांतांमध्ये अरुंद रस्ते, देखभालीचा अभाव आणि हवामानातील आव्हाने अपघातांना कारणीभूत ठरतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List