कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांची घोषणाबाजी

कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांची घोषणाबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज उमरी येथे अजित पवार गटाच्या पक्षप्रवेश मेळाव्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभेत काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि काही शेतकऱ्यांना ताब्यात घ्यावे लागले.

आज उमरी येथे आयोजित मेळाव्यात काही जणांचाअजित पवार गटात प्रवेश झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. अजित पवार यांचे भाषण सुरू असताना काही शेतकरी अचानक उठले आणि “शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा” अशा घोषणा दिल्या. सुमारे तीन ते चार मिनिटे चाललेल्या या घोषणाबाजीमुळे सभेत एकच गोंधळ उडाला. शेतकऱ्यांनी “शेतकरी अडचणीत आहे, कर्जमाफीवर बोला” अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली, त्यामुळे अजित पवारांना आपले भाषण थांबवावे लागले.

यावर अजित पवार यांनी, “आजपर्यंत तीन वेळा कर्जमाफी झाली आहे. एकदा केंद्र सरकारने आणि दोनदा राज्य सरकारने कर्जमाफी दिली. सध्या आर्थिक संकटामुळे कर्जमाफीची घोषणा योग्य वेळी होईल,” असे उत्तर दिले. मात्र, शेतकऱ्यांनी “आजच कर्जमाफी जाहीर करा” असा आग्रह धरला. यामुळे सभेतील गोंधळ वाढला. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत काही शेतकऱ्यांना सभास्थळावरून बाहेर काढले आणि ताब्यात घेतले. सभा संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजा संकटात असून, या काळात शेतकरी हवालदिल झाल्याने शेतकर्‍यांच्या रोषाला वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार उमरी येथे घडला. त्यामुळे संयोजकांची चांगलीच पंचाईत झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा गोंधळ थांबला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यासाठी लोकांना वेळ काढता येत नाहीए. त्यामुळे सकाळी नाश्त्याला फाटा मिळत आहे. तसेच दुपारी जे मिळेल ते...
शरीरात कर्करोग आहे की नाही? ‘हे’ कसे कळेल? जाणून घ्या
दिल्लीत हवेची गुणवत्ता आणखी खालावली; AQI 400 पार, दमाच्या रुग्णांमध्ये वाढ
प्रवासी जीप 700 फूट खोल दरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू; 10 गंभीर जखमी
बायको सतत रील्स बनवायची, चिडलेल्या नवऱ्याने घेतला जीव
राज्यसभा निवडणुकीबाबत भाजपने डील ऑफर केली होती, फारुक अब्दुल्ला यांचा गौप्यस्फोट
अदानी समूहात LIC ची 33,000 हजार कोटींची गुंतवणूक? ग्राहकांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा गैरवापर; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल